आशीष ठाकूर

बाजारात मंदीच्या वातावरणात तेजीची झुळूक चालू असतानाच विवेचन होत, येणाऱ्या दिवसात निर्देशांक सेन्सेक्सवर ३२,८०० आणि निफ्टीवर ९,६०० चा स्तरदेखील पार करतीलच, पण ही तेजी फसवी असेल आणि घडेलही तसेच. सेन्सेक्स ३३,८८७ च्या  उच्चांकावरून ३१,१५८ आणि निफ्टी निर्देशांक ९,८८९ च्या उच्चांकावरून ९,११६ पर्यंत कोसळला. दिव्याची ज्योत ही विझण्याअगोदर मोठी होते, या वाक्याची प्रचीती देऊन गेला.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Kaun Banega Crorepati Season 16 Amitabh Bachchan says I neither keep cash nor visit an ATM
KBC 16 : अमिताभ बच्चन ATM मध्ये कधीच गेले नाहीत, जया बच्चन यांच्याकडून घेतात पैसे, म्हणाले…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

या पार्श्वभूमीवर या आठवडयाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव

सेन्सेक्स : ३१,६४२.७०

निफ्टी : ९,२५१.५०

पेशवाईत घडलेल्या एका प्रसंगाची इथे प्रकर्षांने आठवण येते. तो प्रसंग – राघोबादादा आणि सखारामबापू बोकील (साडेतीन शहाण्यांमधील एक) बुध्दीबळाचा डाव मांडलेला असतो. तेव्हा सखारामबापू बोकील राघोबादादांना म्हणतात, ‘आपल घोडयाचं प्यादं एक घर मागे घ्या.’ याचा गर्भितार्थ अजून अडीच महिने शांत बसा अथवा श्रीमंतांविरुध्द कटकारस्थान करू नका. आज आमच्या गुंतवणूकदारांबरोबरदेखील असंच घडतं आहे. तेजीची घोडदौड शाश्वत आहे, असं समजून गुंतवणूकदार तेजीच्या घोडय़ावर स्वार होतात व त्यानंतर घोडं दोन पायावर उभं राहतं. गुंतवणूकदार मात्र आर्थिक जायबंदी होतात. तेव्हा गुंतवणूकदारांच्या बाबतीत एक घर मागे अथवा शांत बसण्याचा अवधी किती असेल ते आज जाणून घेऊ या.

येणाऱ्या दिवसात सेन्सेक्स ३२,७००आणि निफ्टी ९,५०० स्तरावर टिकण्यास सातत्याने अपयशी ठरल्यास निर्देशांकाच प्रथम खालंच लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३०,७०० ते ३०,००० आणि निफ्टीवर ९,००० ते ८,८०० असेल. हा स्तर राखण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास सेन्सेक्स २९,३५० ते २८,२०० आणि निफ्टी ८,५०० ते ८,२०० पर्यंत खाली घसरेल व या पडझडीचा कालावधी मे महिन्याच्या अखेरपर्यंत अथवा जून महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत असेल. या कालावधीत निर्देशांकाचे स्तर हे मागे, पुढे होतील, पण या उपरोक्त कालावधीत तेजीचं घोडं एक पाऊल मागे ठेवणंच श्रेयस्कर.

समभाग संच बांधणीचे निकष :

सद्यस्थितीत साखर उद्योगांनी कल्पकतेचा वापर केल्यास भरपूर संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. ऊसाच्या रसातून साखर निर्माण झाल्यावर जी ऊसाची मळी उरते त्यावर प्रक्रिया केल्यावर जे निर्माण होते ते इथेनॉल. १८ महिन्यापूर्वी जेव्हा तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या तेव्हा तेलाला पर्याय अथवा तेलात मिसळून इथेनॉलचा पर्याय पुढे आला व जेव्हा फक्त इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करत जेव्हा भारतात प्रथम विमानउड्डाण झालं तेव्हा साखर कंपन्या प्रकाशझोतात आल्या. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भावच गडगडल्यामुळे तेल उत्पादनापेक्षा तेल आयात स्वस्त झाल्याने ‘हात चोळत बसण्यापेक्षा’ त्याच हातावर सॅनिटायझर घेऊन हात चोळण्याची परिस्थिती करोनाने निर्माण केली. कारण सॅनिटायझर निर्मितीत पुन्हा इथेनॉल हाच मुख्य घटक असल्याने व बाजारात सॅनिटायझरचाच तुटवडा निर्माण झाल्याने पुन्हा साखर कारखान्यांना सुगीचे दिवस आले.

इतके दिवस दुर्लक्षित असलेली उसाची मळी ही आरोग्यास, अर्थव्यवस्थेस किती हितकारक आहे याची माहिती पुढे आली. मद्य कंपन्यांना व विशेषत: भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (इंडियन मेड फॉरेन लिकर) साठी ही उसाची मळी मुख्य कच्चा माल आहे. तेव्हा मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. पण साखर कंपन्याचे समभाग बाळगणं हे आर्थिक आरोग्यास हितकारक आहे. या दृष्टीकोनातून बलरामपुर चीनी सुचवण्यात आली आहे.

आगामी तिमाही निकालांचा वेध.

बायोकॉन लिमिटेड

तिमाही निकाल – गुरुवार, १४ मे

८ मेचा बंद भाव – रु. ३५९.२०

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३४० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४०० रुपये. भविष्यात ३४० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४३० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ३४० ते ४०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ३४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३१० रुपयांपर्यंत घसरण.

बजाज फायनान्स लिमिटेड

तिमाही निकाल – मंगळवार, १९ मे

८ मेचा बंद भाव – रु. २,०२४.९०

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,००० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,४००रुपये. भविष्यात २,००० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,६०० रुपयांच्या लक्ष्याकडे  वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २,००० ते २,४०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : २,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८०० रुपयांपर्यंत घसरण.

 बजाज ऑटो लिमिटेड

तिमाही निकाल – बुधवार, २० मे

८ मेचा बंद भाव – रु. २,४१६.५०

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,३०० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,३०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५०० रुपये. भविष्यात २,३०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,८०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २,३०० ते २,५०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : निकालानंतर २,३०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,००० रुपयांपर्यंत घसरण.

बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड

तिमाही निकाल – गुरुवार, २१ मे

८ मेचा बंद भाव – ४,६०४.२५ रु.

निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४,६०० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४,६०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५,१०० रुपये. भविष्यात ४,६०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५,५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४,६०० ते ५,१०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : निकालानंतर ४,६०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४,१०० रुपयांपर्यंत घसरण.

 

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader