आशीष ठाकूर
जून महिन्यातील पूर्वार्धात ३ ते १७ जून दरम्यान निफ्टी निर्देशांकाची १६,७९३ वरून १५,१८३ पर्यंतची घसरण बाजाराला मंदीच्या गर्तेत घेऊन गेली होती. त्या वेळेला निफ्टी निर्देशांकावर १४,००० चे खालचे लक्ष्य हे हाकेच्या अंतरावर आहे, अशी धारणा बाजारात निर्माण झालेली. तेव्हा बाजारात मंदीचा अंधकार असल्याने, ‘आता १६,५०० ते १६,८०० च्या तेजीचे तांबड फुटणे केवळ अशक्य!’ निफ्टी निर्देशांक १५,२०० वर असताना जवळपास सर्वच गुंतवणूकदारांची अशी भावना झाली होती. तेव्हा वाचकांना धीर देत, ‘गॅन कालमापन पद्धती’चा आधार घेत, १७ जूनचा १५,१८३ च्या नीचांकाचा आधार घेत, त्या नंतरचा १ जुलैचा १५,५११ चा नीचांक हा चढत्या भाजणीतला नीचांक (हायर बॉटम) हा महत्त्वाच्या तारखेला होत असल्याने (गँन कालमापन पद्धतीचा आधार घेत काढलेली महत्वाची तारीख), त्या वेळेला मंदीला तात्पुरता अटकाव होण्याची शक्यता आलेखावर निर्माण झाली होती.
हाच दुवा पकडत, त्या वेळेला अशक्य वाटणारी निफ्टी निर्देशांकावरील १६,५००-१६,८०० च्या तेजीचे भाकीत केले. या भाकितानुसार, सरलेल्या सप्ताहात १६,५०० चे पहिले वरचे लक्ष्य साध्य करत, दुसऱ्या लक्ष्यासमीप निफ्टी निर्देशांकाची वाटचाल सुरू आहे. मंदीत होरपळून निघालेल्या, कोमेजलेल्या मनावर, तेजीची झुळूक हळुवार फुंकर घालत असल्याने ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे!’ अशी सध्या सर्वत्र भावना आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.
येणाऱ्या दिवसात तेजीच्या वाटचालीत निफ्टी निर्देशांकाला १६,८०० चा अडथळा असेल. या स्तरावरून एक हलकीशी घसरण अपेक्षित असून या घसरणीत निफ्टी निर्देशांकाला १६,५०० चा आधार असेल. हा आधार निफ्टी निर्देशांकाने सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे १६,८०० ते १७,००० असेल आणि द्वितीय लक्ष्य १७,२०० असेल. या स्तरावर अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा (शॉर्ट टर्म ट्रेडर) असलेल्या गुंतवणूकदारांनी समभागांची नफारूपी विक्री करून मुद्दल आणि नफा सुरक्षित करावा.
निकालपूर्व विश्लेषण
१) अॅक्सिस बँक लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, २५ जुलै
२२ जुलैचा बंद भाव – ७३०.७५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७२० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७६० रु., द्वितीय लक्ष्य ८०० रु.
ब) निराशादायक निकाल : ७२० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ६६० रुपयांपर्यंत घसरण.
२) लार्सन अॅण्ड टुब्रो लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २६ जुलै
२२ जुलैचा बंद भाव – १,७६७.७५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,७५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,९५० रु., द्वितीय लक्ष्य २,०५० रु.
ब) निराशादायक निकाल : १,७५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,६०० रुपयांपर्यंत घसरण.
३) कॅनरा बँक
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, २५ जुलै
२२ जुलैचा बंद भाव – २२९.०५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २१५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २१५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २५० रु., द्वितीय लक्ष्य २७० रु.
ब) निराशादायक निकाल : २१५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २०० रुपयांपर्यंत घसरण.
४) टाटा पॉवर कंपनी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २६ जुलै
२२ जुलैचा बंद भाव- २३०.८५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २२० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २४५ रुपये, द्वितीय लक्ष्य २७५ रुपये
ब) निराशादायक निकाल : २२० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २०० रुपयांपर्यंत घसरण.
५) मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २७ जुलै
२२ जुलैचा बंद भाव – ८,८३०.९५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ८,७०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८,७०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९,०५० रु., द्वितीय लक्ष्य ९,४०० रु.
ब) निराशादायक निकाल : ८,७०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ८,४०० रुपयांपर्यंत घसरण.
६) नोसिल लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २८ जुलै
२२ जुलैचा बंद भाव – २८७.९० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २७० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३०० रु., द्वितीय लक्ष्य ३२० रु.
ब) निराशादायक निकाल : २७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २५० रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@cult-personality-in
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.