‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’मध्ये दिवाळी खरेदीनिमित्ताने सुरू झालेल्या ‘गुंतवणूक फराळ’ विशेष उपक्रमासाठी वेगवेगळ्या विश्लेशकांनी पाठविलेल्या उर्वरीत आठ कंपन्या नोव्हेंबर महिन्याच्या अतिथी विश्लेशक या सदरात..
जागतिक अर्थगतीचे प्रतिबिंब
हिंमतसिंगका सैद लिमिटेड
(बीएसई कोड – ५१४०४३)
” ९१.७५
वार्षिक उच्चांक/नीचांक :
“१०५.९० / “४४.३०
दर्शनी मूल्य : ” ५
 पी/ई : १०.५८
ल्ल िहमतसिंगका सैद या कंपनीची स्थापना कोलकोता येथील हिमतसिंगका समूह व इटलीतील सैद यांनी संयुक्तरित्या केली. कंपनी घरांसाठी आलिशान वस्त्रप्रावरणे (लक्झरी होम फर्निशिंग्ज) यांची निर्मात्री आहे. कंपनीने आपला व्यवसाय दोन गटात विभागला आहे. पहिला प्रकार पलंगपोस, पडदे, उशांचे अभ्रे यांची निर्माती व दुसरा प्रकार ही उत्पादने विकणारी विक्री दालने. देशांतर्गत उत्पादनांची विक्री कंपनी स्वत:च्या दालनांतून करते तर उत्तर अमेरिका, युरोप, मध्य आशियाई देशांमधील अनेक साखळी दुकांनांसाठी ही कंपनी पुरवठादार आहे. कंपनीने आपली उत्पादने दोन गटात विभागली आहेत. पहिला स्वत:च्या पसंतीने केलेली रंगसंगती व दुसऱ्या गटात एखाद्या साखळी दुकानासाठी ग्राहकाच्या पसंतीने तयार केलेली (डिझायनर प्रॉडक्ट्स) उत्पादने. कंपनीच्या एकूण विक्रीपकी ३५ टक्के अमेरिकेतून, ३५ टक्के युरोपातून, २० टक्के मध्यपूर्व आशिया, १० टक्के दक्षिण पूर्व आशिया आणि ५ टक्के देशांतर्गत विक्रीतून होते. कंपनी आपली उत्पादने ‘अॅटमॉस्फीअर’ या नाममुद्रेखाली विकते. मागील तिमाहीत कंपनीने ं३े२स्र्ँी१ी्िर१ीू३.ूेह्ण हे संकेतस्थळ आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिले असून आता ग्राहक कंपनीची उत्पादने ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकतात.

कंपनीने अमेरिकेत डिव्हाटेक्स होम फॅशन्स या नावाने १०० टक्के मालकीच्या उपकंपनीची स्थापना केली आहे. दुबई व सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय पद्धतीची विक्री दालने सुरू केली आहेत. अशाच पद्धतीची विक्री दालने युरोपात सुरू करण्याच्या योजना कंपनीने आखल्या आहेत. कंपनीच्या उत्पादनांची विक्री ही अर्थव्यवस्थेच्या गतीशी प्रत्यक्ष निगडीत आहेत. कंपनीची ९५ टक्के विक्री भारताबाहेर होते. सुधारत असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची लाभार्थी म्हणून या कंपनीची आम्ही शिफारस करीत आहोत. मागील आíथक वर्षांसाठी कंपनीचे उत्सर्जन (ईपीएस) ६.६७ रुपये होते. या पूर्ण आíथक वर्षांत कंपनीचे उत्सर्जन १२ अपेक्षित आहे. सध्याच्या भावाचे २०१६ च्या उत्सार्जनाशी गुणोत्तर (पी/ई) ७.३५ पट असून पुढील एका वर्षांसाठी आम्ही १२७ रुपयांचे लक्ष्य निर्धारित करीत आहोत.
सौम्यदीप राहा (मायक्रोसेक रिसर्च या दलाली पेढीत मिडकॅप विश्लेषक) ई-मेल: srah@microsec.com   

पुस्तकी मूल्यापेक्षा स्वस्त
हिंडाल्को इंडस्ट्रीज लि.
(बीएसई कोड – ५२२००५)
” ९०.९०
वार्षिक उच्चांक/नीचांक :
“१०४.७५ / “३५.२०
दर्शनी मूल्य : ” १०
 पी/ई : ८.३७
ल्ल ऑस्टिन इंजिनियिरग कंपनी लिमिटेड ही बेअिरग उत्पादक आहे. चार भागीदारांनी एकत्र येऊन १९७३ मध्ये गुजरात राज्यात जुनागढ जिल्ह्यात सुरू केलेला व्यवसाय आज शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपनीत बदलला आहे. ही कंपनी बहुभांडवली वस्तू, वाहन उद्योग, रेल्वे, आदी विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बेअिरग्जचे उत्पादन करते. जहाज उद्योगात वापरण्यासाठी कंपनी १००० मिमी व्यासाच्या बेअिरगचे उत्पादन करते. कंपनी आपली उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेसोबत इटली, ब्रिटन, अमेरिकेत निर्यात करते. कंपनीची सिंगल व डबल डीप ग्रूव्ह बेअरिंग, थ्रस्ट बॉल बेअरिंग, सिलिंड्रिकल रोलर बेअिरग स्पेरिकल बॉल बेअिरग, टेपर्ड रोलर बेअिरग, नीडल रोलर बेअिरग व इतर प्रकारच्या बेअिरग्जचे उत्पादन करते. कंपनीची उत्पादने वाहन उद्योग, पेपर मिल, सीमेंट उद्योग, खाण उद्योग, औष्णिक ऊर्जानिर्मिती आदी ठिकाणी वापरली जातात. कंपनी आपली उत्पादने ऑस्टिन इंजिनीयिरग कंपनीची आद्याक्षरे मिळून तयार झालेल्या ‘एईसी’ या नाममुद्रेने विकते.
कंपनीचे भागभांडवल अवघे ३.४ कोटी असून ५२ कोटींची गंगाजळी आहे. भागभांडवलात कंपनीच्या प्रवर्तकांचा वाटा ३४.५७ टक्के आहे. उल्लेखनीय म्हणजे कंपनीचे पुस्तकी मूल्य १५८.७९ रुपये इतके आहे.
कंपनीचे सहामाही निकाल नुकतेच जाहीर झाले. सहामाही विक्री ४१.०५ कोटींवरून ५१.३० कोटी रुपये झाली आहे. कंपनीचे पहिल्या सहा महिन्यासाठीचे प्रति समभाग उत्सर्जन ५.६२ रुपये झाले आहे. संपूर्ण वर्षांत कंपनीची विक्री १०६ कोटी रुपये व ४.६५ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे. वार्षकि उत्सर्जन (ईपीएस) १३.३६ रुपये अपेक्षित असून सद्य भाव उत्सर्जनाच्या ७.२ पट (पी/ई) आहे. आम्ही अल्प काळासाठी १२७ रुपयांचे लक्ष्य निर्धारित करून खरेदी करण्याचा सल्ला देत आहोत.
 ो मनिष श्रीवास्तव (अमृतलाल केशवलाल या दलाली पेढीचे विश्लेषक)  ई-मेल: mshivastav@amrutkeshav.in

Story img Loader