‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’मध्ये दिवाळी खरेदीनिमित्ताने सुरू झालेल्या ‘गुंतवणूक फराळ’ विशेष उपक्रमासाठी वेगवेगळ्या विश्लेशकांनी पाठविलेल्या उर्वरीत आठ कंपन्या नोव्हेंबर महिन्याच्या अतिथी विश्लेशक या सदरात..
जागतिक अर्थगतीचे प्रतिबिंब
हिंमतसिंगका सैद लिमिटेड
(बीएसई कोड – ५१४०४३)
” ९१.७५
वार्षिक उच्चांक/नीचांक :
“१०५.९० / “४४.३०
दर्शनी मूल्य : ” ५
पी/ई : १०.५८
ल्ल िहमतसिंगका सैद या कंपनीची स्थापना कोलकोता येथील हिमतसिंगका समूह व इटलीतील सैद यांनी संयुक्तरित्या केली. कंपनी घरांसाठी आलिशान वस्त्रप्रावरणे (लक्झरी होम फर्निशिंग्ज) यांची निर्मात्री आहे. कंपनीने आपला व्यवसाय दोन गटात विभागला आहे. पहिला प्रकार पलंगपोस, पडदे, उशांचे अभ्रे यांची निर्माती व दुसरा प्रकार ही उत्पादने विकणारी विक्री दालने. देशांतर्गत उत्पादनांची विक्री कंपनी स्वत:च्या दालनांतून करते तर उत्तर अमेरिका, युरोप, मध्य आशियाई देशांमधील अनेक साखळी दुकांनांसाठी ही कंपनी पुरवठादार आहे. कंपनीने आपली उत्पादने दोन गटात विभागली आहेत. पहिला स्वत:च्या पसंतीने केलेली रंगसंगती व दुसऱ्या गटात एखाद्या साखळी दुकानासाठी ग्राहकाच्या पसंतीने तयार केलेली (डिझायनर प्रॉडक्ट्स) उत्पादने. कंपनीच्या एकूण विक्रीपकी ३५ टक्के अमेरिकेतून, ३५ टक्के युरोपातून, २० टक्के मध्यपूर्व आशिया, १० टक्के दक्षिण पूर्व आशिया आणि ५ टक्के देशांतर्गत विक्रीतून होते. कंपनी आपली उत्पादने ‘अॅटमॉस्फीअर’ या नाममुद्रेखाली विकते. मागील तिमाहीत कंपनीने ं३े२स्र्ँी१ी्िर१ीू३.ूेह्ण हे संकेतस्थळ आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिले असून आता ग्राहक कंपनीची उत्पादने ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा