• मेष:-
    कर्मठपणे आपले मत दर्शवाल. वडीलधाऱ्यांचा आदर करावा. बुद्धीची प्रगल्भता दाखवावी. शासकीय कामे होतील. चुकीच्या गोष्टीचा विरोध कराल.
  • वृषभ:-
    उगाचच खचून जाऊ नये. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वेळच्यावेळी औषधोपचार करावेत. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. चिकाटी धरून ठेवावी.
  • मिथुन:-
    शांतपणे आपले मत नोंदवाल. नवीन पद्धतीचा वापर करावा. आधुनिक बाजू जाणून घ्यावी. जोडीदाराचे कौतुक कराल. घरगुती प्रश्न समर्थपणे सोडवाल.
  • कर्क:-
    गैरसमजुतीत अडकू नका. कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करावा. संसर्गजन्य विकार संभवतात. हाताखालील लोकांकडे लक्ष ठेवा. कामात सातत्य ठेवावे लागेल.
  • सिंह:-
    व्यावहारिकता जपाल. धोरणीपणे विचार कराल. कामात दीर्घ चिकाटी ठेवाल. तुमच्या बुद्धीचे कौतुक केले जाईल. अविश्वास दाखवू नका.
  • कन्या:-
    वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे. काही कामात जरा अधिक कष्ट पडतील. विचार भरकटू देऊ नका. कामातील उत्साह वाढेल. अति कामामुळे थकवा जाणवेल.
  • तूळ:-
    खोलवर विचार कराल. मनन, चिंतन करण्यावर भर द्याल. पराक्रमाला वाव आहे. स्वकर्तृत्वावर भर देऊन वागाल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील.
  • वृश्चिक:-
    सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीत फार विचार कराल. शक्यतो मोजकेच बोलाल. कंजूसपणा कराल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल.
  • धनु:-
    प्रौढपणे वागाल. निराश होण्याचे काही कारण नाही. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. काही बदलांकडे सकारात्मकतेने बघावे. सरकारी कामे करण्यात वेळ जाईल.
  • मकर:-
    कामातील उशिराने वैतागून जाऊ नये. योग्य संधीची वाट पाहावी. प्रयत्नात कसूर करू नका. निराशेला मनातून बाजूला सारावे. आध्यात्मिक बळ वाढवावे.
  • कुंभ:-
    गुंतवणुकीचा योग्य पर्याय शोधाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका. व्यवहारिक विचार कराल. नवीन मित्र जोडावेत. एकाच बाजूने विचार करू नका.
  • मीन:-
    अहंपणे विचार करू नयेत. चुकीच्या कल्पना बाजूला साराव्यात. घरात धार्मिक कार्यक्रम होतील. परिस्थितीनुरूप वागाल. वडिलांशी जुळवून घ्यावं.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader