मेष:-स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाप्रमाणे घालवावा. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. गरजूंना मदत कराल.
वृषभ:-मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. व्यावसायिक अडचण मिटवाल. चांगल्या कामाची योजना आखाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.
मिथुन:-आर्थिक व्यवहार पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. तुमचे मनोबल वाढीस लागेल.
कर्क:-परिवारातील प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कामाची दिवसभर धांदल राहील. कामाचा ताण नियोजनाने कमी करावा. आपलाच हेका खरा कराल.
सिंह:-कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. शक्यतो हलका आहार घ्यावा. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. प्रकाश झोतात याल.
कन्या:-मित्रमंडळींचे सहकार्य घ्यावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संयम ढळू देऊ नका. कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल. विशाल दृष्टीकोन बाळगावा.
तूळ:-नातेवाईकांची मागणी पुरवाल. जोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो. आकांततांडव करू नका. स्पर्धेत यश मिळवाल. उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल.
वृश्चिक:-आर्थिक प्रश्न सोडवाल. काही प्रश्न गोडीने सोडवावेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. बोलण्यावर ताबा ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्या.
धनू:-आज कामातून चांगला लाभ होईल. रेस, जुगार यातून नफा कमवाल. वादाच्या मुद्यातून मार्ग काढाल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. भौतिक सुखात वाढ होईल.
मकर:-व्यवसायातून चांगला लाभ होईल. लहानांशी मतभेदाची शक्यता. घराबाहेर वावरतांना सावध रहा. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
कुंभ:-मनाचा तोल सांभाळावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल. उगाच बंधनात अडकू नका. वैचारिक धोरण बदलून पहावे. दिवस काहीसा धावपळीत जाईल.
मीन:-शक्यतो सौम्य प्रतिक्रिया द्या. वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्या. व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर