1 January Rashi Bhavishya In Marathi : आज १ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी दुपारी २ वाजून २५ मिनिटांपर्यंत राहील. व्याघात योग ५ वाजून ६ मिनिटांपर्यंत जुळून येईल. उत्तराषाढा नक्षत्र रात्री ११ वाजून ४६ मिनिटांपर्यंत जागृत असेल. उत्तराषाढा हे आकाशात स्थित २७ नक्षत्रांपैकी २१वे नक्षत्र आहे. आज राहू काळ दुपारी १२ ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. तर उत्तराषाढ नक्षत्रात मेष ते मीनचा २०२५ वर्षाचा पहिला दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊयात…

१ जानेवारी पंचांग व राशिभविष्य :

मेष:- दिवस संमिश्र असेल. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका.

Lucky Zodiac Signs to Shine with Wealth & Fortune
Weekly Horoscope : नवीन वर्षातील पहिल्या आठवड्यात निर्माण होतोय धनयोग, चमकणार ‘या’ चार राशींचे नशीब; मिळणार पैसाच पैसा!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Saturn's Nakshatra transformation
२०२५ च्या सुरूवातीपासून ‘या’ तीन राशींना अनेक अडचणी येणार; शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने आर्थिक समस्याही उद्भवणार
Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा
Gajakesari and Malvya Raja Yoga
१० वर्षानंतर निर्माण होणार गजकेसरी आणि मालव्य राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
shani vakri 2025
२०२५ मध्ये १३८ दिवस शनीची वक्री चाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना करणार मालामाल
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?

वृषभ:- जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंददायी अनुभव येतील. भागीदारीत फार विसंबून राहू नका. आजचा अंतिम निर्णय तुमचा असेल.

मिथुन:- आज कामाचा थकवा येईल. परंतु आळस झटकून कामाला लागावे. उगाच उदास होऊ नका. कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. मतभेदाला बळी पडू नका.

कर्क:- उगाचच रेंगाळत बसून राहू नका. वेळेचा सदुपयोग करावा. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल. आवडता छंद पूर्ण करता येईल.

सिंह:- मनात शंकेला थारा देऊ नका. सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. शैक्षणिक अडचणी दूर होतील. काही नवीन खरेदी करता येईल. घरात टापटीप ठेवाल.

कन्या:- जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. दुचाकी वाहन जपून चालवावे. शंकेचे समाधान करून घ्याल. नसते साहस दाखवायला जाऊ नका.

तूळ:- मोकळ्या स्वभावाने लोकांचे मन जिंकाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो. इच्छे विरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. कौटुंबिक गैरसमज टाळावेत.

वृश्चिक:- अति संवेदनशीलता दाखवू नका. वाईट गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आपलेच मत खरे कराल. नवीन मार्गांचा विचार कराल.

धनू:- आजचा दिवस सामान्य असेल. भावांकडून मदत मिळेल. कोणावरही विसंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे. मोहाला बळी पडू नका.

मकर:- आपल्या क्षमतेचा योग्य वापर करावा. खरेदी करताना सावध राहावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. प्रवासात काळजी घ्यावी.

कुंभ:- कार्यालयीन कामात गोंधळ उडू शकतो. चित्त स्थिर ठेवावे. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही. एकावेळी अनेक कामे हाताळू नका.

मीन:- भाग्याची चांगली साथ मिळेल. नवीन गुंतवणूक करता येईल. त्यातून चांगला नफा मिळेल. नातेवाईकांची भेट आनंद देणारी असेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader