Aries To Pisces Horoscope Today in Marathi : आज मंगळवार १० डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी मंगळवारी रात्री ३ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असेल. १० डिसेंबर रोजी रात्री १० वाजून ३ मिनिटांपर्यंत व्यतिपात योग राहील. तसेच उत्तराभाद्रपद नक्षत्र दुपारी १ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर आज आयुष्यात काय बदल घडवेल हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१० डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.

वृषभ:- आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

मिथुन:- आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील.

कर्क:- जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

सिंह:- स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.

कन्या:- आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.

तूळ:- घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.

वृश्चिक:- भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या.

धनू:- आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

मकर:- नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.

कुंभ:- काही गोष्टींचे चिंतन करावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे.

मीन:- अति घाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर