10 February 2025 Rashi Bhavishya in marathi: आज माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहील. १० फेब्रुवारी रोजी, प्रीती योग सकाळी १० वाजून २७ पर्यंत असेल, त्यानंतर आयुष्मान योग सुरू होईल. याशिवाय, पुनर्वसु नक्षत्र सोमवारी संध्याकाळी ६ वाजून १ वाजेपर्यंत राहील. आकाशात असलेल्या २७ नक्षत्रांपैकी पुनर्वसु नक्षत्र हे सातवे नक्षत्र मानले जाते. तर आज राहू काळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटांपासून सुरू होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसंच आज श्री विश्वकर्मा जयंती आहे. विश्वकर्मा जयंतीच्या पवित्र सोहळ्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हा दिवस भगवान विश्वकर्मा दैवी शिल्पकार आणि विश्वाचे निर्माता यांच्या कृतज्ञेत साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आज पुनर्वसु नक्षत्रात मेष ते मीनचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

१० फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य : (10 February 2025 Horoscope)

मेष: कामाची लगबग राहील. काही अनपेक्षित बदल जाणवतील. लहान मुलांमध्ये रमून जाल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. हातातील कामात यश येईल.

वृषभ: प्रवासात काहीसा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. काही कामात अडकून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील इच्छेला पूर्णत्व येऊ शकते. जिथे जाल तिथे आनंद वाटाल.

मिथुन: औद्योगिक वातावरण चांगले राहील. काही गोष्टी अनपेक्षितपणे लाभतील. आवडते खाद्यपदार्थ चाखायला मिळतील. तुमची समाजप्रियता वाढेल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल.

कर्क: वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे. चिकाटी सोडून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जुनी कामे नव्याने सामोरी येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

सिंह: व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. मनातील संकोच दूर सारावा. जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करावे. कामातून समाधान शोधाल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

कन्या: जोडीदाराच्या मताचा आदर कराल. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. घरातील समस्या जाणून घ्याव्यात. अचानक धनलाभ संभवतो. स्थावरची कामे मार्गी लागतील.

तूळ: कामाला योग्य दिशा मिळेल. उत्कृष्ट साहित्य वाचनात येईल. घरातील कामात अधिक लक्ष घालावे लागेल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. कामे वेळेत पूर्ण करता येतील.

वृश्चिक: आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. मत्सराला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य गणित मांडावे. गरज पाहून खर्च करावा.

धनू: शांत व संयमी विचारांची जोड घ्यावी. उतावीळपणा करून चालणार नाही. आपले कष्ट सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देवू नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

मकर: मानसिक चंचलता जाणवेल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल. काही कामे तुमचा कस पाहतील.

कुंभ: श्रमामुळे थकवा जाणवेल. मैत्रीचे संबंध जपावेत. पैशाचे गणित तपासून पहावे लागेल. कामात चंचलता आड आणू नका. नवीन लोकांच्यात मिसळावे.

मीन: गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील. झोपेची तक्रार दूर करावी. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. हातातील कामात यश येईल. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 february 2025 rashibhavishya panchang in marathi 10 february horoscope mesh to meen zodiac signs dvr