Navpancham Rajyog Guru Shukra Yuti: २०२४ चे नववर्ष सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या वर्षात कुंडलीत नेमके काय बदल होणार याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता, कुतूहल निर्माण झाले आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहाल तर नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक राजयोग निर्माण होत आहेत. तब्बल १० वर्षांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुरु व शुक्र या ग्रहांच्या युतीतून ‘नवपंचम राजयोग’ निर्माण होत आहे. या राजयोगासह काही राशींवर अत्यंत शुभ प्रभाव सुरु होणार आहे परिणामी करिअरपासून प्रेमाच्या नात्यांपर्यंत अनेक बाबींमध्ये सुस्पष्ट बदल दिसून येऊ शकतात. २०२४ च्या नवीन वर्षात कोणत्या राशींमध्ये नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे यामुळे तुमच्या कुंडलीत नेमके काय बदल होऊ शकतात हे आपण पाहणार आहोत. तुमच्या राशीत धनलाभाचे कोणते मार्ग उपलब्ध असतील हे सुद्धा पाहूया..

१० वर्षांनी नवपंचम राजयोग बनल्याने ‘या’ राशींवर नववर्षात होईल धनवर्षाव

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

गुरू, शुक्राच्या लाभ योगामुळे मेहनत घेतल्यास आणि चिकाटी ठेवल्यास महत्त्वाच्या कामात यश मिळेल. प्रगतीपथावर आगेकूच कराल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावेशनी आपल्या लाभ स्थानातील कुंभ राशीत मार्गी स्थितीत असल्याने मेष राशीला शनी सुद्धा लाभदायक ठरेल. भाग्यातील आणि दशम स्थानातील रवी आपल्या कर्तृत्वाची पोचपावती देईल. सातत्य राखणे फार गरजेचे ठरेल. वरिष्ठ मंडळींशी संवाद साधताना शब्द सांभाळून वापरावेत. मेष राशीला वाणीच्या माध्यमातून धनलाभ मिळवता येईल.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…
mithun
Mithun Rashifal 2025: नववर्षात मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चमकणार! शनीदेवाची होणार कृपा
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

नवपंचम राजयोग आपल्या राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. भाग्यातील गुरू मात्र साहाय्य करेल. विद्यार्थी वर्गाला अडचणीतून मार्ग काढता येईल. धीर सोडू नका. शनीच्या कुंभ राशीतील स्थितीमुळे तसेच गुरुमुळे मोठी आव्हाने पेलून धराल. लाभ स्थानातील मंगळ आर्थिकदृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यास प्रवृत्त करेल. मेहनत आणि सातत्य राखल्यास यश तुमचेच आहे. कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी कला जोपासाल. तुम्हाला कलेच्या माध्यमातून किंबहुना तुमच्या नियमित कामातून वेगळ्या अनुषंगाने धनप्राप्ती होण्याची शक्यता अधिक आहे.

हे ही वाचा<< २०२४ हे ‘या’ जन्मतारखांच्या व्यक्तींचे ‘सुख’वर्ष! शनी तुम्हाला करणार धनवान, तुम्ही आहात का ते नशीबवान?

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

नवपंचम राजयोग वृश्चिक राशीचे अच्छे दिन करिअरमधील प्रगतीच्या रूपात सुरु होऊ शकतात. लहानमोठे प्रवास करण्यास योग चांगले आहेत. कामानिमित्त वा कामाव्यतिरिक्त प्रवासाचा आनंद घ्याल. स्थावर मालमत्तेसंबंधीत कामे हळूहळू मार्गी लागतील. खरेदी वा विक्री करण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत. विद्यार्थी वर्गाला गुरुबल चांगले असल्याने प्रयत्नांना उत्तम यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हाल. जोडीदारासह जुळवून घ्याल. कौटुंबिक परिस्थिती हळुवारपणे हाताळाल. नोकरी व्यवसायात धनलाभ होईल. आई वडिलांच्या रूपात वृश्चिक राशीला लक्ष्मी कृपा अनुभवता येऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader