Chaturgrahi Yog Tilkund Chaturthi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज १२ फेब्रुवारीला माघी गणेश जयंतीची तिथी सुरु होत आहे. संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी गणेश जयंती तिथीचा प्रारंभ होईल व १३ फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत तिथी कायम असेल. उदयस्थितीनुसार १३ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती व १२ फेब्रुवारीला तिलकुंद चतुर्थी साजरी होणार आहे. या शुभ तिथीवरच आणखी एक दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. शनीच्या स्वामित्वाची रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर राशीत तब्बल १०० वर्षांनी चार ग्रह एकाच वेळी उपस्थित असणार आहेत. मकर राशीत सूर्य, बुध, मंगळ ग्रह अगोदरच भ्रमण करत आहेत तर आज १२ फेब्रुवारीला धन, वैभव, प्रेम व राजयोगांचा कारक शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या चार ग्रहांच्या युतीसह चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या मुळे प्रभावित राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. बाप्पाचा व लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाल्याने या राशी बुद्धिशाली व धनाढ्य होऊ शकतात. या भाग्यवान राशींमध्ये तुमची रास आहे का हे पाहूया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा