Kendra Trikon Rajyog 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानु प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने गोचर, वक्री, उदय, अस्त होऊन राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. काही वेळा जेव्हा काही ग्रह एकमेकांच्या गोचर कुंडलीत एकत्र येतात तेव्हा त्यातून अनेक शुभ राजयोग तयार होत असतात. अलीकडेच १ जुलै २०२३ ला मंगळ ग्रहाने सिंह राशीत गोचर केले आहेत. तर शुक्रदेव सुद्धा सिंह राशीतच स्थिर आहेत. मंगळ व शुक्राची युती झाल्याने तब्बल १०० वर्षांनी तीन राशींच्या गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. १०० वर्षांनी जुळून आलेला हा केंद्र त्रिकोण राहयोग हा या राशींचे भाग्य उजळून त्यांना प्रचंड कमाईची संधी देऊ शकतो. नेमक्या कोणत्या राशींच्या भाग्यात हा राजयोग आहे व त्यांना नेमका कशाप्रकारचा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया …
केंद्र त्रिकोण राजयोग ‘या’ राशींना बनवणार करोडपती?
मेष रास (Aries Zodiac Horoscope)
मेष राशीच्या गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने प्रचंड मोठा धनलाभ होण्याचे संकेत आहेत. या राशीच्या लोकांना धनलाभासह कुटुंबाची सुद्धा भक्कम साथ लाभू शकते. कुटुंबीयांमध्ये आनंद व उत्साह टिकून राहण्यासाठी तुम्ही कारण ठरू शकता. मिळकत वाढण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती भक्कम झाल्याने अनपेक्षित पद्धतीने आयुष्यात आनंद येऊ शकतो. वाणीच्या जोरावर मोठे यश मिळवू शकता. जुनी भांडणे व मतभेद दूर होऊ शकतात. विवाहयोग आहे.
तूळ रास (Libra Zodiac Horoscope)
तूळ राशीला केंद्र त्रिकोण राजयोग अनुकूल फळ देऊ शकतो. आपल्याला कोर्टाच्या खटल्यांमध्ये यश मिळू शकते. येत्या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाला अनेक महत्त्वाचे पैलू झळाळी देऊ शकतात. तुमचे पद व आर्थिक बळ वाढू शकते ज्यामुळे समाजात तुम्हाला विशेष महत्त्वाचे स्थान मिळू शकते. तुम्हाला धन मिळवताना आपल्याकडून समाजाला काही तरी देऊ करण्याची सुद्धा संधी मिळू शकते.
हे ही वाचा<< हातावर ‘अशी’ विवाह रेखा असते श्रीमंत जोडीदार मिळण्याचा संकेत; पाहा ६ वेगळे प्रकार व अर्थ
सिंह रास (Leo Zodiac Horoscope)
सिंह रास असलेल्यांना केंद्र त्रिकोण राजयोग लाभदायक ठरू शकतो. तुमची प्रलंबित पदोन्नती व पगारवाढ होण्याची संधी आहे. तुम्हाला पैशांची बचत व गुंतवणूक करता येऊ शकते. व्यवसायात गुंतवणूक केल्यास लाभ होऊ शकतो. कुटुंबासह एखादी लहानशी ट्रिप होऊ शकते. संतती प्राप्तीचा योग्य आहे, नवीन वाहन, घर अशा रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)