10th September Rashi Bhavishya & Panchang : आज १० सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी रात्री ११ वाजून १३ पर्यंत राहील. आज मंगळवारी अनुराधा नक्षत्र रात्री ८ वाजून ०४ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज विष्कंभ योग असणार आहे. तर राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

सध्या देशभरात गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. बाप्पाच्या आगमनानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. गणपती बाप्पा नंतर आपण गौराईच्या आगमनाचाही आतुरतेने वाट पाहत असतो. तर यंदा मंगळवारी म्हणजेच आज १० सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल; तर बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त १० सप्टेंबर रोजी सूर्यदयापासून ते संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर आजचा दिवस मेष ते मीन राशींचा कसा जाईल हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
4th September Panchang & Marathi Rashi Bhavishya
४ सप्टेंबर पंचांग: बुधाच्या राशी परिवर्तनामुळे कोणाला होईल लाभ? अडकलेले पैसे मिळतील तर ‘या’ राशींवर होईल सुखाचा वर्षाव
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचांग : मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
30th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
३० ऑगस्ट पंचांग: रखडलेली कामे लागतील मार्गी, लक्ष्मीच्या कृपेने होईल अचानक धनलाभ; कसा असेल तुमचा शुक्रवार? वाचा राशीभविष्य
3rd September Panchang & Marathi Rashi Bhavishya
३ सप्टेंबर पंचाग: मंगळवारी १२ पैकी ‘या’ राशींसाठी जोडीदाराचा सल्ला ठरेल मोलाचा; आर्थिक बाजू, कौटुंबिक सुख तर कामात मिळेल यश; वाचा तुमचे भविष्य
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य

१० सप्टेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- आपली चिडचिड इतरांना दाखवू नका. संयम बाळगून वागा. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.

वृषभ:- धार्मिक ग्रंथांचे वाचन होईल. व्यवसायात नीतिचा मार्ग अवलंबा. आजचा दिवस समाधानकारक ठरेल. नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. अप्रिय व्यक्तींची भेट त्रासदायक ठरेल.

मिथुन:- मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा. उगाच वाईटपणा घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपाव्यात. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. जुनी कामे मार्गी लावाल.

कर्क:- नवीन कामाकडे लक्ष ठेवा. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. सन्मानात वाढ होईल. मुलांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

सिंह:- कौटुंबिक तिढा सोडवायला मदत कराल. मिळकतीचा नवीन स्त्रोत उत्पन्न होईल. एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल. बोलण्यातून माधुर्य दर्शवाल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

कन्या:- जुन्या आजारांवर वेळीच लक्ष द्या. कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका. धनसंचयात वाढ होईल. व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.

तूळ:- आनंदाची अनुभूति घ्याल. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक:- वडिलोपार्जित धनाचा लाभ होईल. कोणत्याही संशयित कामात अडकू नका. पराक्रमात वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्यावा.

धनू:- जुन्या धार्मिक कथांचे श्रवण कराल. मन:शांती लाभेल. विरोधक माघार घेतील. एखाद्या व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल.

मकर:- दिवस आनंदात जाईल. जुनी सर्व कामे मार्गी लावाल. आर्थिक व्यवहारात यश येईल. जुने प्रयत्न फलद्रुप होतील. कार्यालयीन सदस्य कौतुक करतील.

कुंभ:- मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. विचारपूर्वक पाऊले उचला. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात. अडचणीतून मार्ग निघेल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

मीन:- घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. जुने परिचित लोक भेटतील. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर