11th to 17th December Saptahik Rashi Bhavishya: डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत ग्रहमानानुसार अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत. विशेषतः आठवड्याच्या शेवटी सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करून १२ वर्षांनी बुधासह थेट युती करून बुधादित्य राजयोग निर्माण करणार आहेत. तसेच शनीचा शश व शुक्राचा मालव्य राजयोग सुद्धा या आठवड्यात अधिक सक्रिय असणार आहे. यामुळे या आठवड्याच्या कालावधीत तीन राशींचे भाग्य चमकणार आहे. चुटकीसरशी अनेक कामे मार्गी लागून प्रचंड मोठा धनलाभ होऊ शकतो असेही ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. तर मग या आठवड्यात नेमक्या कोणत्या राशी नशीबवान सिद्ध होणार आहेत, त्यांना कुठल्या मार्गाने व कसा धनलाभ होण्याची शक्यता आहे हे पाहूया..
११ ते १७ डिसेंबर दरम्यान ‘या’ राशींवर असेल लक्ष्मी कृपा
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
कर्क राशीसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक असणार आहे, मागील काही काळापासून आपल्या नियमित आयुष्यात काही अडथळे येत होते मात्र ही सगळी संकटे आता दूर होणार आहेत व तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहात होतात ती पूर्णत्वास जाऊ शकते. हे सात दिवस तुमच्या नशिबाला कलाटणी देतील पण तुमच्या आयुष्यात शांती, सुख व समाधान घेऊन येऊ शकतील. नोकरी- व्यवसायात तुम्हाला सहकाऱ्यांची साथ लाभेल ज्यामुळे तुम्ही वेळेत काम पूर्ण करू शकता. आर्थिक पाठबळ लाभल्याने आपल्याला या कालावधीत आपल्या नातेसंबंधांकडे लक्ष देता येईल. वैवाहिक आयुष्यात सुखाची चिन्हे आहेत.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
तूळ राशीला मेहनतीचे गोड फळ देऊन जाणारा असा हा आठवडा असणार आहे. तुमची खूप प्रशंसा होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमचे कष्ट दिसून येतील व त्यातून तुम्हाला पदोन्नतीची साधी आहे. तुम्ही विवाह करण्यासाठी इच्छुक असलात तर या कालावधीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. प्रेमाने आयुष्य बहरून जाईल.
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
वृश्चिक राशीच्या नशिबात बदलाचे संकेत आहेत. तुम्हाला नव्या नोकरीची संधी मिळू शकते, नोकरीत बदल तुमच्यासाठी प्रचंड धनलाभ घेऊन येऊ शकतो. आपण कुटुंबासह वेळ घालवू शकाल ज्यामुळे मन आनंदाने भरून जाईल. निर्णय घेण्यात गडबड व घाई टाळावीत तरच आपली कामे योग्य पद्धतीने मार्गी लागू शकतात. काम पूर्ण झाल्यावर स्वतःसाठी वेळ काढता येईल ज्यामुळे हा आठवडा तणावमुक्त ठरू शकतो.
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
धनु राशीसाठी हा आठवडा खूपच फायदेशीर ठरू शकतो. खूप दिवस अडकून पडलेली कामे पूर्ण होतील. प्रॉपर्टी किंवा वाहनाच्या खरेदीसाठी संधी मिळेल. लक्ष्मी माता आपल्या राशीत विराजमान होऊन बुधादित्य राजयोगाचे लाभ द्विगुणित करू शकते. राशीतील सूर्याच्या वास्तव्यामुळे व बुधाच्या वक्री प्रभावामुळे तुम्हाला व्यक्तिमत्व उजळण्याची संधी मिळू शकते. या कालावधीत तुमच्या वाणीवर काम केल्यास तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची चिन्हे आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)