Jupiter Vakri In Taurus 2024: ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, शिक्षण, धार्मिक कार्य, पुत्र, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. प्रत्येक ग्रहाप्रमाणे गुरू ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. गुरू तब्बल बारा वर्षानंतर वृषभ राशीमध्ये वक्री झाला असून तो या राशीत ११९ दिवस वक्री अवस्थेत राहील. ज्याच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना आयुष्यात सुख-समृद्धी आणि धनसंपत्ती मिळेल.

गुरू तीन राशींना करणार मालामाल

वृषभ

11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरूची वक्री अवस्था खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल.

कर्क

गुरूची वक्री अवस्था कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला नोकरी, व्यवसायात हवी तशी प्रगती करता येईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. तुमच्यातला उत्साह वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल. संपत्ती संबंधित समस्या दूर होतील.

हेही वाचा: डिसेंबरपर्यंत शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ दोन राशींच्या आयुष्यात येणार सुख आणि संपत्ती

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना गुरूची वक्री अवस्था खूप भाग्यकारी असेल. या काळात अचानक धनलाभ होतील, अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आकस्मिक धनलाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)