11th July Panchang & Rashi Bhavishya: आज ११ जुलै २०२४ ला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी व षष्ठी तिथी आहे. पंचमी तिथी आज सकाळी १० वाजून ४ मिनिटांनी संपल्यावर षष्ठी तिथी चालू होणार आहे. आजचा पूर्ण दिवस पार करून पहाटे ४ वाजून ९ मिनिटांपर्यंत वरीयान योग असणार आहे. आजच्या दिवशी स्कंद षष्ठी व्रत असेल. ११ जुलै हा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल हे पाहूया..

११ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:- मन:स्वास्थ्य बिघडू देऊ नका. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. क्षुल्लक गोष्टींचा फार विचार करू नका. मुलांची काळजी लागून राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Rahu Mangal Gochar 2025
Rahu Mangal Gochar 2025 : १०० वर्षानंतर राहु आणि मंगळ बदलणार चाल, ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
Libra Yearly Horoscope 2025 in Marathi| Tula Rashi Bhavishya 2025 in Marathi
Libra 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्न जुळतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल… तूळ राशीला संपूर्ण वर्ष कसे जाईल? वाचा ज्योतिषतज्ज्ञ काय सांगतात
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
Singh Rashi Bhavishya 2025 in Marathi
Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

वृषभ:- ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. आवडीची कामे करायला वेळ मिळेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. आपला मूड बिघडणार नाही याची काळजी घ्या.

मिथुन:- अवास्तव चर्चा करू नका. सत्याची कास सोडू नका. मित्रांशी सुसंवाद साधावा. घरातील वातावरण हसते-खेळते ठेवाल. आपली हौस पूर्ण करून घ्याल.

कर्क:- जोडीदाराच्या वर्तनाने ताण वाढू शकतो. सरसकट एकच विचार करू नका. हातातील कामात यश येईल. बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. भावंडांची उत्तम साथ मिळेल.

सिंह:- बोलताना शब्दांचे वजन लक्षात घेऊन बोला. आपलेच मत खरे करायला जाऊ नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खायला मिळतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील.

कन्या:- अनावश्यक खर्चाला आवर घालावी लागेल. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल.

तूळ:- मानसिक तोल ढळू देऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जोडीदाराच्या मताला पुष्टी द्याल. काही तडजोडी कराव्या लागतील.

वृश्चिक:- मनातील इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. कामात पळवाट शोधून चालणार नाही. दिवस संमिश्र राहील. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

धनू:- अनावश्यक सल्ले देऊ नका. मुलांच्या तक्रारी वाढू शकतात. त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. जोडीदाराविषयी संभ्रम दूर होईल.

मकर:- संपूर्ण माहितीशिवाय वक्तव्य करू नका. उगाच जुन्या गोष्टीत उकरून काढत बसू नका. योग्य आहार घ्यावा. घरातील गोष्टी संयमाने हाताळाव्यात. शक्यतो वादविवादात पडू नका.

कुंभ:- नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. उष्णतेचे त्रास संभवतात. कामात किरकोळ समस्या जाणवू शकतात. मनाची द्विधावस्था होऊ शकते. अति विचार करू नका.

हे ही वाचा<< गुरुपौर्णिमेनंतर अडीच दिवस ‘या’ ३ राशी कमावतील प्रचंड धन व सन्मान; नवपंचम राजयोग बनताच ‘या’ रूपात दार ठोठावेल लक्ष्मी

मीन:-चेष्टा जपून करावी. वेळ पाळणे खूप गरजेचे आहे. कौटुंबिक घडी सांभाळावी. आर्थिक बाबीत आततायीपणे वागू नका. बोलताना भडक शब्दांचा वापर करू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader