11th March 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: आज ११ मार्च २०२४ ला फाल्गुन महिन्याची सुरुवात होत आहे. फाल्गुन शुक्ल प्रकाशातील प्रतिपदेची तिथी पूर्व भाद्रपद व रेवती नक्षत्रात जुळून पडणार आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीला नेमक्या कोणत्या बाबींमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे तर कोणत्या रूपात तुम्हालाही लाभ होऊ शकतात हे पाहूया..

मेष:-वागण्या-बोलण्यात काहीसा हटवादीपणा येईल. कामात गतीमानता येईल. स्वत:बद्दलच्या नसत्या कल्पना बाजूला साराव्यात. बुद्धिचातुर्याने कामे कराल. परिस्थितीनुरूप वागणे ठेवाल.

Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Daily Horoscope for Aries To Pisces
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Today is the shortest day and longest night of the year
आज वर्षातील सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या नेमकं असं का?
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Yearly Horoscope 2025 in Marathi
Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य

वृषभ:-वागण्यात कर्मठपणा आणाल. वडीलांचा मान ठेवून निर्णय घ्यावा. प्रगल्भतेने वागणे ठेवाल. न्यायी वृत्तीने मत मांडाल. नवीन विचार आत्मसात करावेत.

मिथुन:-प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. अति विचार करू नका. अचानक धनलाभ संभवतो. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.

कर्क:-शांत व संयमी विचार कराल. वैचारिक आधुनिकता ठेवावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. भावंडांना मदत कराल. घराची सजावट कराल.

सिंह:-चुकीच्या लोकांमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. परिस्थिती जाणून योग्य मार्ग काढावा. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. वाताचे विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढवू नका.

कन्या:-मनातील नसते संशय काढून टाकावेत. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. आपल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करावा. दीर्घकाळ चिकाटीने कामे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

तूळ:-घरगुती कामात अधिक कष्ट पडू शकतात. आपल्या गृहसौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील कामात यश येईल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. प्रवासात वाहन जपून चालवावे.

वृश्चिक:-काही गोष्टींचा अधिक खोलवर विचार करावा. धैर्याने कामे हाती घ्याल. व्यवसायात चांगली आर्थिक कमाई होईल. हातात काही नवीन अधिकार येतील. कौटुंबिक खर्चाचा ताण राहील.

धनू:-काही बदल जाणीवपूर्वक करावेत. नसत्या वादात अडकू नका. निराशेच्या आहारी जाऊ नये. घराची कामे सुरळीत पार पडतील. स्वबळावर कामे उरकाल.

मकर:-जुन्या गोष्टींचा आधार घेणे टाळावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करावे लागतील. छुप्या शत्रूंची डोकेदुखी वाढेल. हातातील अधिकार वापरावेत.

कुंभ:-उगाचच कोणाशीही वैर पत्करू नका. काही कारणाने घरापासून दिवसभर दूर राहावे लागेल. गप्पांची मैफल जमवाल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

हे ही वाचा<< १८ वर्षांनी राहू बुध ‘या’ राशीत एकत्र आल्याने ४ राशींचे वाईट दिवस संपणार; धनलाभासह मिळेल नशिबाला कलाटणी

मीन:-कामाचा योग्य आढावा घ्यावा. मानसिक ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मानापमान फार मनावर घेऊ नका. आपले स्वत्व गुण राखून वागाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader