11th October Rashi Bhavishya & Panchang : आज ११ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी रात्री १२ वाजून ७ मिनिटांपर्यंत राहील. आज शुक्रवारी सुकर्म योग जुळून येईल आणि रात्री २ वाजून ४६ मिनिटांपर्यंत राहील. तसेच उत्तराषाढा नक्षत्र शनिवारी पहाटे ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत जागृत असेल. तर आज राहू काळ सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच ११ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रीचा नववा दिवस आहे. आज दुर्गा देवीचे नववे रूप सिद्धिदात्रीची पूजा केली जाईल. देवी सिद्धिदात्रीची आराधना केल्याने भक्तांचे सर्व दुःख, भय आणि रोग नष्ट होतात असे मानले जाते. तर आज सिद्धिदात्री देवीच्या कृपेने कोणचे दुःख दूर होणार तर कोणाच्या पदरात सुखं पडणार हे आपण जाणून घेऊ या…

११ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- चांगली मन:शांती लाभेल. नवीन नोकरीसाठी विचारणा होईल. सारासार विचार आणि सकारात्मकता ठेवा. कामे सुलभतेने पार पडतील. आपले ध्येय गाठण्यासाठी हर संभव प्रयत्न करा.

वृषभ:- जोडीदाराच्या मताचा विचार करावा. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. व्यापारा निमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. नवीन मित्रांशी संवाद वाढेल. फसवणुकीपासून सावध राहावे.

मिथुन:- नातेवाईकांशी संबंध सुधारतील. धाकट्या भावंडांना मदत कराल. दिवस मध्यम फलदायी. अपेक्षित कमाईची कामना मनात बाळगाल. मनातील विचारांना आळा घालावा लागेल.

कर्क:- पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. जोडीदाराविषयी नाराजी चटकन दर्शवू नका. जवळचे मित्र भेटतील. गप्पांचे फड जमवाल. क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता.

सिंह:- कामात नवीन अधिकार हाती येतील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. भावंडांच्या सहवासात रमून जाल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल. छंद जोपासायला वेळ काढाल.

कन्या:- अतिरिक्त पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करावी. आपल्याकडून दानधर्म केला जाईल. घरातील वातावरण आनंदी व खेळकर राहील. आपले विचार खुलेपणाने मांडाल. गायन कलेला चांगला वाव मिळेल.

तूळ:- घरासाठी पैसे खर्च कराल. मनात योजलेले काम पूर्ण कराल. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. नव्या संधीमुळे मनावरील ताण कमी होईल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.

वृश्चिक:- द्विधा मन:स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. दिवस धावपळीत जाईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.

धनू:- जोडीदाराकडून कौतुक केले जाईल. समोरच्या व्यक्तिला शब्द देताना सावध रहा. संमिश्र घटना जाणवू शकतात. झोपेची तक्रार जाणवू शकते. जुने मित्र भेटतील.

मकर:- दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरासंबंधी कामात कौटुंबिक सदस्यांची मते विचारात घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. जोडीदाराची साथ व सहकार्य लाभेल. अनिश्चिततेचे मळभ दूर होईल.

कुंभ:- मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. समोरच्या व्यक्तिला विश्वासात घेऊन काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. मिळालेल्या संधीचे सोने करावे. बोलतांना भान हरवू नका.

मीन:- अनेक दिवस अडून राहिलेले काम पूर्ण होईल. समोरच्यावर संपूर्ण विश्वास टाकू नका. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस. अचानक धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11th october rashi bhavishya panchang siddhidatri devi blessed mesh to meen for new opportunity read horoscope in marathi asp
Show comments