Daily Astrology In Marathi : १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी आज संध्याकाळी ७ वाजून २३ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी ८ वाजून ०७ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहील, त्यानंतर शोभन योग जुळून येईल. तसेच आश्लेषा नक्षत्र आज संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपर्यंत जागृत असणार. तर राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय आज रात्री ९ वाजून ५६ मिनिटांनी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. तर आज सौभाग्य योगात १२ राशींचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

१२ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य

मेष:- व्यावसायिक स्तर सुधारेल. अपेक्षित लाभाची अपेक्षा पूर्ण होईल. कामात सहकार्‍यांची मदत घेता येईल. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल. कामाची योग्य पावती मिळेल.

11 February 2025 Horoscope In Marathi
११ फेब्रुवारी राशिभविष्य: पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने ‘या’ ४ राशींना मिळणार भरपूर सुख; तुमची रास असेल का भाग्यवान?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
7 February 2025 Mesh To Meen Horoscope
७ फेब्रुवारी राशिभविष्य: इंद्र योगात कर्क, कन्यासह ‘या’ राशींचे बदलणार नशीब? कामात मिळेल भरपूर यश; वाचा तुमचा कसा असेल दिवस
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
gajkesari rajyog being formed on 06 febuary 2025 these zodiac sign will be lucky
महाशिवरात्रीच्या आधी निर्माण होतोय गजकेसरी राजयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा
surya guru gochar 2025 sun jupiter make kendra drishti yog these zodiac sign will be lucky
होळीच्या आधी ‘या’ तीन राशींची होईल चांदी! सूर्य-गुरू निर्माण करणार केंद्र योग, प्रत्येक कामात मिळणार यश
2nd February 2025 Rashi Bhavishya
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?
basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण

वृषभ:- अपेक्षित लाभाने खुश व्हाल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. अधिकारी व्यक्तींचा घरात वावर राहील. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.

मिथुन:- मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. आपली कला इतरांसमोर सादर करता येईल.
तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. मदतीचा हात सढळ ठेवाल.

कर्क:- अचानक धनलाभाची शक्यता. वैचारिक स्थिरता ठेवावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पत्नीशी मतभेद संभवतात.

सिंह:- भागीदाराशी मतभेद संभवतात. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. मुलांचे धाडस वाढेल.

कन्या:- पत्नीची उत्तम साथ मिळेल. एकमेकांमधील प्रेमळ सहवास वाढीस लागेल. भागीदाराशी सुसंवाद साधला जाईल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. प्रलोभनापासून दूर राहावे.

तूळ:- कामातील ऊर्जा वाढेल. हातात नवीन अधिकार येतील. आकर्षणाला बळी पडू नका. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल. नातेवाईकांची मदत घेता येईल.

वृश्चिक:- सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. स्त्रियांशी ओळख वाढेल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. सहवासातून मैत्री घट्ट होईल.

धनू:- घराचे सुशोभीकरण काढाल. कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील वातावरण खेळीचे राहील. जवळचा प्रवास घडेल.

मकर:- शांततेचे धोरण स्वीकारावे. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी. आध्यात्मिक बळ वाढवावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

कुंभ:- मानसिक स्थैर्य जपावे. घाई घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा. आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवावे. मित्रांशी मतभेद संभवतात.

मीन:- आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. कामातील बदल जाणून घ्यावेत. बदलाकडे सकारात्मकतेने पहावे. फसवणुकी पासून सावध रहा. आनंदी दृष्टिकोन ठेवून वागावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader