12th February Marathi Horoscope: १२ फेब्रुवारीला माघ महिन्यातील तिलकुंद चतुर्थीची तिथी सुरु होत आहे. संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी तिथी प्रारंभ होत असून १३ फेब्रुवारीपर्यंत तिथी कायम असेल. माघी गणेश जयंतीच्या एक दिवस आधी आज नेमक्या कोणत्या राशीला भरघोस फायदा होऊ शकतो हे पाहूया. जाणून घ्या मेष ते मीन राशीचे भविष्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-वडीलांचा विरोध जाणवेल. न्यायीपणा ने वागाल. शासकिय कामात अधिक लक्ष द्यावे लागेल. वैचारिक कर्मठपणा दर्शवाल. नवीन विचारांची कास धरावी.

वृषभ:-जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. वारसाहक्काची कामे पुढे सरकतील. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

मिथुन:-काही गोष्टी दिरंगाई ने होतील. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात. आधुनिक बाजू जाणून घ्यावी. शांतपणे विचार करावा.

कर्क:-गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कष्टाला पर्याय नाही. काही गोष्टी दिरंगाई ने होतील. वात-विकार बळावू शकतात. आपली संगत तपासून पहावी.

सिंह:-बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल. चिकाटीने कामे कराल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. राजकारणी लोकांना फायदा होईल. ज्ञानात भर पडेल.

कन्या:-घरातील ज्येष्ठांशी जुळवून घ्यावे. दिवस घरकामांत निघून जाईल. भावंडांची बाजू विचारात घ्या. मुलांचे प्रश्न सामोरे येतील. मानसिक स्वास्थ्य जपावे.

तुळ:-चिंतनातूनच योगी मार्ग काढावा. सर्व बाजूंचा सखोल विचार कराल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. स्व-कर्तृत्वावर भर द्याल. चट्कन निराश होऊ नका.

वृश्चिक:-स्थावरच्या कामांत गती येईल. चिकाटीने कामे कराल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. कमीत-कमी शब्दांत मत मांडा. व्यवहारी दृष्टिकोन ठेवावा.

धनू:-पायाचा त्रास जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आवाक्याबाहेरील खर्च टाळावा. मनातील चिंता बाजूला सारावी. ध्यानधारणा करावी.

मकर:-चांगला व्यावसायिक लाभ होईल. काही कलागुण दिसायला वेळ द्यावा. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. स्थावरची कामे मार्गी लागतील. फार चिंता करत बसू नका.

कुंभ:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. महिला आपली हौस पूर्ण करतील. नवीन गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. नवीन मित्र जोडावेत.

हे ही वाचा<< १८ मार्चपर्यंत शनी महाराज ‘या’ राशींना देतील सोन्यासारखं आयुष्य; आजपासून नशिबाला कलाटणी देत होईल धन वर्षाव

मीन:-कामात एकसूत्रता ठेवावी. फार चंचलपणे वागू नका. गप्पा मारण्यात वेळ घालवाल. आपल्यापेक्षा वयाने लहान लोकांशी मैत्री कराल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 february panchang tilkund chaturthi shubh muhurta mesh to meen 12 rashi bhavishya who will get ganpati blessing money astrology svs
Show comments