Ajche Rashi Bhavishya In Marathi : ४ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी रात्री ८ वाजून १३ मिनिटांपर्यंत राहील. रात्री ९ वाजून ४५ मिनिटांपर्यंत शोभन योग जुळून येणार आहे. याशिवाय शनिवारी पहाटे ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत आर्द्रा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस आहे. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कोणती आनंदाची बातमी घेऊन येणार हे जाणून घेऊया…
४ एप्रिल पंचांग व राशिभविष्य:
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
कामातील उत्साह व जोम वाढेल. ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. नवीन संधि उपलब्ध होतील. कागदपत्रांची नीट तपासावी . आवडी निवडीबाबत दक्ष राहाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
प्रत्येक गोष्टीचा आनंद उठवाल. कामात अधिक आवडीने रस घ्याल. तोंडात साखर ठेवून वागाल. हौसे खातर खर्च कराल. करमणुकीचे कार्यक्रम आखाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
अधिकारी वर्गाचा सल्ला घ्यावा. मोठ्या लोकांची गाठ घ्याल. कमिशन मधून फायदा होईल. बरेच दिवसांची सुप्त इच्छा पूर्ण होईल. संपर्काचा फायदा करून घ्याल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
जोडीदाराची कमाई वाढेल. लेखक वर्गाला चांगला फायदा होईल. बुद्धिकौशल्याने मन जिंकून घ्याल. तुमचे कसब कामाला लावाल. कामात स्त्री वर्गाची मदत होईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
कलाकारांचे कौशल्य दिसून येईल. वरिष्ठांना खुश करू शकाल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. वेळेचा योग्य सदुपयोग कराल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. चर्चेतून योग्य मार्ग निघेल. कौटुंबिक प्रश्न समजूतदारपणे हाताळाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. भागीदारीत नवीन योजना आखाल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. जोडीदारावर तुमचा प्रभाव राहील. कमी श्रमात कामे पूर्ण करता येईल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधावा. देणी भागवता येतील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
एककल्ली विचार करू नका. अती आग्रह बरा नव्हे. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवावे. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
दिवस मना प्रमाणे घालवाल. बोलताना सारासार विचार करावा. घरगुती कामे अंगावर पडतील. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
उष्णतेचे विकार संभवतात. पचनास हलके पदार्थ खावेत. डोके थंड ठेवावे लागेल. फार काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. उगाचच चिडचिड करू नये.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
आरोग्यात सुधारणा होईल. कामाचा आनंद घेता येईल. हातातील अधिकाराचा वापर करता येईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल. चैनीची आवड जोपासाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
गप्पांमध्ये रमून जाल. हसत-हसत कामे पूर्ण कराल. निसर्ग सानिध्याची ओढ वाढेल. सामाजिक गोष्टीत हातभार लावाल. मित्रांची नाराजी गोडीने दूर करावी.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd