12th July Marathi Panchang & Rashi Bhavishya: १२ जुलै २०२४ ला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील उदया तिथीनुसार षष्ठी आहे. दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत षष्ठी कायम असेल व त्यानंतर सप्तमी सुरु होईल. शुक्रवारी पूर्ण दिवस, पूर्ण रात्र व शनिवारी सकाळी ५ वाहून १५ मिनिटांपर्यंत परीघ योग असणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजून ९ मिनिटांपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी वृषभ मंगळ राशीत प्रवेश करणार आहे. आजच्या आषाढ शुक्रवारी मेष ते मीन राशींचे भविष्य जाणून घेऊया..

१२ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-कार्यक्षेत्रात एखादे परिवर्तन घडून येईल. संवेदनशीलता ठेवावी लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. पोटाची तक्रार जाणवू शकेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल.

6th July Ashadh Prarambh Panchang & Rashi Bhavishya
६ जुलै पंचांग: आषाढ महिन्याच्या सुरुवातीला शनीचं वरदान; आज अचानक धनलाभासह १२ राशींना काय फायदा होईल पाहा
24th July Panchang & Rashi Bhavishya
संकष्टी चतुर्थी २४ जुलै पंचांग: मेषला अच्छे दिन तर धनूला लाभणार नवी ओळख; १२ राशींना बाप्पा आज कसा देतील प्रसाद?
18th July Panchang & Rashi Bhavishya
१८ जुलै पंचांग: ब्रह्म योग अन् अभिजात मुहूर्तामुळे आज कुणाला होणार धनलाभ? १२ राशींच्या नशिबात आज लिहिलंय वाचा
11th July Panchang & Rashi Bhavishya
११ जुलै पंचांग: कुणाला कौटुंबिक सौख्य तर कुणाला खर्चाचा फटका; मेष ते मीन राशींना आजचा गुरुवार कसा जाईल, वाचा
Shani Rahu Nakshatra Gochar
शनी राहूच्या जोडीमुळे २०२५ पर्यंत तब्बल ८ राशी होणार अपार श्रीमंत; बघता बघता बदलेल आयुष्य, कुंडलीत कसे येतील अच्छे दिन?
13th July Panchang & Rashi Bhavishya
१३ जुलै पंचांग: मीनला भागीदारीतून धनलाभ, मेषच्या जोडीदाराचं वर्चस्व; शनिवारी शिव योग जुळल्याने १२ राशींना काय मिळणार?
17th July Ashadhi Ekadashi Rashi Bhavishya
आषाढी एकादशी, १७ जुलै पंचांग: आज विठोबा कोणत्या राशींना पावणार? देव निद्रेस जाण्याआधी बदलतील ‘या’ मंडळींचे दिवस
22nd July Panchang & Rashi Bhavishya
२२ जुलै पंचांग: मिथुन राशीस अचानक धनलाभ तर ‘या’ राशींना यश गवसणार; मेष ते मीन १२ राशींचा आठवडा कसा होईल सुरु?

वृषभ:-निर्णय ऐनवेळी बदलावे लागू शकतात. डोळ्याचे विकार संभवतात. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवस गप्पा व मौजमजेत जाईल.

मिथुन:-टीका कारांकडे दुर्लक्ष करावे. आपल्या जवळील आनंद लक्षात घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मनोबल वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क:-निष्कारण वादंग नको. मनातील गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. घरगुती जबाबदारीत वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. घाईने निर्णय घेऊ नयेत.

सिंह:-मनातील स्वप्न साकार होईल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. मुलांबाबतच्या जबाबदार्‍या पार पाडाल. राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

कन्या:-दिवस आनंदात जाईल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कराल. परस्पर संवादातून सुखद बदल होतील. विरोधक नरम भूमिका घेतील. कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

तूळ:-ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. मनातील चलबिचलता काढून टाकावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. दिनक्रम व्यस्त राहील.

वृश्चिक:-व्यावसायिक स्तरावर अनुकूल घटना घडतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रापंचिक ताण कमी होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

धनू:-जिद्द सोडून चालणार नाही. परिस्थितीशी जमवून घ्यावे लागेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. समोरील गोष्टींकडे सकारात्मकतेने पहावे.

मकर:-मनावर कोणताही दबाव न आणता वागावे. निर्णयाची कारणमीमांसा कराल. आपल्या मतावर अडून राहाल. धार्मिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:-समोरच्याचे मत खोडून काढाल. ठाम भूमिका घ्याल. हातातील अधिकाराचा वापर कराल. अचानक धनलाभ संभवतो. अति काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका.

हे ही वाचा<< गुरुपौर्णिमेनंतर अडीच दिवस ‘या’ ३ राशी कमावतील प्रचंड धन व सन्मान; नवपंचम राजयोग बनताच ‘या’ रूपात दार ठोठावेल लक्ष्मी

मीन:-आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. फार चिडचिड करू नका. कौटुंबिक वातावरण खेळकर ठेवावे. मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर