Horoscope Today in Marathi : १३ डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहील. १३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजून ५४ मिनिटांपर्यंत शिवयोग जुळून येईल. तसेच १३ डिसेंबर रोजी भरणी नक्षत्र सकाळी ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत जागृत असेल आणि त्यानंतर कृतिका नक्षत्र दिसेल. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असेल. तर पंचांगानुसार तुमच्या नशिबात आज कसं सुखं येईल हे आपण जाणून घेऊया…

१३ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल.

shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
navpancham yog in kundali
शुक्र-गुरू बनवणार नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा
7 December astrological predictions for zodiac signs
७ डिसेंबर पंचांग: धनिष्ठा नक्षत्रात १२ राशींवर होणार सुखाचा वर्षाव; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय खास?
Shukra Nakshatra Gochar 2024
११ डिसेंबरपासून ‘या’ राशीच्या लोकांची होईल चांदी चांदी! धनाचा दाता शुक्र करणार श्रवण नक्षत्रात प्रवेश, यशाबरोबर कमावणार पैसाच पैसा
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
mithun
Mithun Rashifal 2025: नववर्षात मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चमकणार! शनीदेवाची होणार कृपा
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

वृषभ:- तब्येतीला जपा. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचे मित्र भेटतील.

मिथुन:- मनासारखी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल.

कर्क:- आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारावा. गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल.

सिंह:- मुलांकडून चांगली बातमी समजेल. हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. प्रयत्नांची कास सोडू नये.

कन्या:- कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा.

तूळ:- आपल्याच मुद्यावर अडून राहाल. मनातील संभ्रम दूर सारावा. उगाचच एखादी चिंता सातवेल. मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे.

वृश्चिक:- गरज नसेल तर फार बोलू नका. सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल. उगाच लपवा छपवी करू नका. बौद्धिक ताण जाणवेल.

धनू:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जुनी येणी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदार्‍या चिकाटीने पार पाडाव्यात.

मकर:- कामावर अधिक निष्ठा ठेवावी. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.

कुंभ:- समोरील संधीचा लाभ घ्यावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका. अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा.

मीन:- अनावश्यक खरेदी केली जाईल. आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader