13th August 2024 Panchang & Rashi Bhavishya: आज १३ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. पहाटे ९ वाजून ३२ मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी चालेल, त्यानंतर नवमी तिथी सुरू होईल. आज मंगळवारी दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांपर्यंत ब्रम्ह योग राहील. तसेच सकाळी १० वाजून ४४ मिनिटांपर्यंत विशाखा नक्षत्र राहील आणि त्यानंतर अनुराधा नक्षत्र दिसेल. आज राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. उद्या दुसरा श्रावणी मंगळावर आणि दुर्गाष्टमी व्रत सुद्धा असेल. आजच्या दिवशी मेष ते मीन राशींना कसा लाभ होऊ शकतो हे पाहू या.

१३ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- फसव्या आश्वासनांपासून दूर रहा. आत्मविश्वासाने कामे करा. अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील. आर्थिक बाजू सुधारेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील.

In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा
Singh Rashi Bhavishya 2025 in Marathi
Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

वृषभ:- कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. व्यावसायिक गोष्टीतील संभ्रम टाळावा. जीवनस्तर सुधारण्याचे योग. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराला खुश कराल.

मिथुन:- दिवस आपल्या मनासारखा जाईल. धडपड करून का होईना काम पूर्ण कराल. कामांना अपेक्षित गती येईल. शाश्वत प्रयत्न करत रहा. हातातील कामात निष्काळजीपणा करू नका.

कर्क:- व्यावहारिक स्पष्टता ठेवावी. भावंडांची चिंता लागून राहील. करियर व वैयक्तिक चिंता सतावतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल.

सिंह:- आपली ठाम मते मांडावीत. प्रसंगांना कणखरपणे सामोरे जा. व्यापारी वर्गाने परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. मंदी चिंता वाढवणारी असेल. नोकरदार वर्गाने आळस झटकून कामे करावीत.

कन्या:- घरासाठी योग्य अशी खरेदी कराल. चिकाटी सोडू नका. दिवस धावपळीचा जाईल. मात्र त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक सदस्यांचा स्नेह वाढेल.

तूळ:- कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. कामातील क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. विनाकारण मन चिंताग्रस्त राहील. आपले स्पर्धक त्रस्त करू शकतात. साहसाच्या जोरावर कामे पूर्ण कराल.

वृश्चिक:- लोक तुमचा सल्ला मानतील. रखडलेल्या कामांना मार्गी लावायला जोर लावा. काहीसा मानसिक त्रास संभवतो. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. नैराश्य टाळण्याचा प्रयत्न करा.

धनू:- बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. मानसिक अस्थिरता टाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. निष्काळजीपणा करू नका. आत्मविश्वासाने काम करा.

मकर:- सामाजिक प्रतिष्ठा चांगली मिळेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा होतील. अति अपेक्षा बाळगू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रलोभनांना बळी पडू नका.

कुंभ:- लोकांच्या बोलण्याची आपल्यावर भुरळ पडू शकते. कलेत मन रमेल. अधिकार्‍यांच्या सहकार्‍याचा वापर करून घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. मेहनतीला पर्याय नाही.

मीन:- दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. गुरु कृपेमुळे उन्नती साधता येईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हितशत्रूपासून सावध राहावे. मोठे व्यवहार आज टाळता आले तर पहा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader