13th June Panchang & Rashi Bhavishya: १३ जून २०२४ ला पंचांगानुसार, ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असणार आहे. गुरुवारच्या दिवशी रात्री ९ वाजून ३४ मिनिटांपर्यंत सप्तमी तिथी असणार आहे. आज संध्याकालो ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत वज्र योग कायम असणार आहे. आजचा पूर्ण दिवस, पूर्ण रात्र पार करून उद्या सकाळी ५ वाजून ९ मिनिटांपर्यंत पूर्वा फाल्गुन नक्षत्र जागृत असणार आहे. याशिवाय आज सकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी गुरु रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या नशिबात नेमकं काय लिहिलंय हे पाहूया..

१३ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-मानसिक द्विधावस्था जाणवेल. अती विचारात वेळ वाया जाईल. कौटुंबिक गोष्टीला अधिक प्राधान्य द्या. सामुदायिक वादापासून दूर रहा. कामात काहीशी प्रतिकूलता जाणवेल.

14 June Panchang & Marathi Rashi Bhavishya
१४ जून पंचांग: दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींच्या नशिबात घडतील मोठे बदल; लक्ष्मी कोणत्या राशीत देईल तुम्हाला आशीर्वाद?
8th June Panchang & Rashi Bhavishya
८ जून पंचांग: शनिवारी बरसणार आनंद सरी; तुमच्या राशीच्या कुंडलीत शनी महाराज काय बदल घडवणार पाहा, १२ राशींचे भविष्य
18th June Marathi Panchang & Rashi Bhavishya
१८ जून पंचांग: मंगळ होणार शक्तिशाली! मेष ते मीन राशींपैकी कुणाच्या नशिबात आज शिव योग, काम, खर्च व प्रेमाची स्थिती वाचा
24th June Panchang & Rashi Bhavishya
२४ जून पंचाग: इंद्रदेव मेष ते मीन राशींपैकी ‘या’ मंडळींच्या कुंडलीत पाडणार सुखाचा पाऊस; धनवृद्धीने सुरु होईल आठवडा
1st July 2024 Panchang And Rashi Bhavishya Mesh To Meen Which zodiac signs will be blessed by Lord Shiva Read Daily Marathi horoscope
१ जुलै पंचांग: व्यवसायात भरघोस वाढ ते कौटुंबिक सौख्य; १२ पैकी या राशींवर राहील शंकराची कृपा; वाचा ‘सोमवार’चे तुमचे राशिभविष्य
27th June 2024 Guruvar Rashi Bhavishya Krishna Paksha Shashti Tithi mesh to mean zodiac signs daily marathi horoscope in marathi
२७ जून पंचांग: नोकरी, व्यवसायात मिळेल लाभ, कामानिमित्त घडतील प्रवास; मेष ते मीन राशींचा असा जाईल गुरुवार
16th June Panchang & Rashi Bhavishya Marathi
१६ जून पंचांग: सूर्य चमकणार! जूनच्या सर्वात शुभ रविवारी मेष ते मीन राशींना कशी साथ देईल नशीब, वाचा तुमचं राशी भविष्य
21st June Panchang & Rashi Bhavishya
वटपौर्णिमा विशेष, २१ जून पंचांग: आज मेष ते मीन पैकी कुणाला लाभणार सौभाग्य; तुमच्या नशिबात कोणत्या रूपात येईल सुख?

वृषभ:-मित्रमंडळींशी वाद संभवतात. अधिकारी वर्गाचा पगडा राहील. कष्ट अधिक व वेळ कमी अशी स्थिती राहील. मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल. कौटुंबिक प्रश्नांबाबत चिंता वाटेल.

मिथुन:-मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करा. पैशाचा अपव्यय टाळा. मोहाला बळी पडू नका. अती अपेक्षा बाळगून चालणार नाही. कर्जाचे व्यवहार तूर्तास टाळावेत.

कर्क:-भावनेच्या आहारी जाऊ नका. मनात नसत्या कल्पना रंगवत बसू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. हट्टीपणाने वागून चालणार नाही. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात.

सिंह:-छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. हातातील लाभाबाबत गाफिल राहू नका. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. पायाचे विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्या.

कन्या:-काही गोष्टी जुळवून घ्यावा लागतील. उगाच विरोधाला विरोध करत बसू नका. अधिकाराचा योग्य वापर करा. वेळेचे योग्य नियोजन करावे. रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ:-उष्णतेच्या तक्रारी जाणवू शकतात. तिखट व तामसी पदार्थ खाण्याची इच्छा होईल. कमी श्रमातील कामाकडे लक्ष द्याल. अचानक धनलाभाची शक्यता. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर रहा.

वृश्चिक:-वैवाहिक सौख्यात भर पडेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. कसरत करण्याकडे अधिक कल राहील. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. मानसिक अशांततेच्या आहारी जाऊ नका.

धनू:-कौटुंबिक गोष्टी प्राधान्याने सोडवा. दुचाकी वाहन चालवताना अधिक काळजी घ्यावी. संघर्षमय वातावरणाचा ताण कमी करा. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनात शंकेला थारा देऊ नका.

मकर:-सारासार विचार करून निर्णय घ्या. स्वमतावर आग्रही राहाल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. संघर्षमय स्थिती निवळण्याचा प्रयत्न करा. इतरांवर फार विसंबून राहू नका.

कुंभ:-अती उदारपणा दाखवणे योग्य नाही. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. दिवसभर काही न काही खटपट करत रहा. मनाजोगी खरेदी करता येईल.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायण २ जुलैपर्यंत ‘या’ ३ राशींच्या कुंडलीला देणार कलाटणी; तुमचे दार ठोठवणार धनलाभ व श्रीमंतीची संधी

मीन:-उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटाल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. नवीन उर्जेने कामे हाती घ्या. स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्या. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर