14 February 2025 Rashi Bhavishya In Marathi : १४ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी रात्री ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील. उद्या सकाळी ७ वाजून ३३ मिनिटांपर्यंत सुकर्म योग जुळून येईल. रात्री ११ वाजून १० मिनिटांपर्यंत पूर्वी फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर आज १२ राशींचा दिवस कसा असणार हे आपण जाणून घेऊया…
१४ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope) :
मेष:- मानसिक चंचलता जाणवेल. कर्ज प्रकरणे सध्या टाळावीत. जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल. लहानांशी मैत्री कराल.
वृषभ:- स्त्री समूहात अधिक वावराल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. दिवस काहीसा आळसात जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. गैरसमजाला बळी पडू नका.
मिथुन:- कलेचे योग्य मानधन मिळेल. सामाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल करू नका. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल.
कर्क:- धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. पित्त विकार बळावू शकतात, गैरसमजाला खतपाणी घालू नका. भावंडांना मदत करावी लागेल. खाण्या पिण्याचे पथ्य पाळा.
सिंह:- अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा होतील. मुलांची धडाडी वाढेल.
कन्या:- वैवाहिक सौख्यात भर पडेल. जोडीदाराविषयी समाधानी असाल. वाहन विषयक कामे होतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. घरात काही बदल कराल.
तूळ:- क्षुल्लक गोष्टीं वरून चिडचिड करू नका. मानसिक शांतता जपावी. आत्मविश्वास बाळगावा लागेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा.
वृश्चिक:- स्वच्छंदीपणे वागाल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ जाईल. स्व मतावर ठाम राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.
धनू:- घराचे सुशोभीकरण काढाल. प्रवासाचा आनंद घेता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमळपणाने वागाल. मानसिक शांतता लाभेल.
मकर:- अघळपघळपणे बोलणे टाळा. संयमी विचार करावा. गायन कलेचे कौतुक केले जाईल. हातून एखादे सत्कार्य घडेल. कौटुंबिक खर्चाकडे लक्ष ठेवा.
कुंभ:- बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. मित्रांशी सलोखा वाढवावा. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.
मीन:- मनाजोगा दिवस घालवाल. लाघवीपणे सर्वांना आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. सौंदर्य वादी नजर बाळगाल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर