14th August 2024 Panchang & Rashi Bhavishya: आज १४ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी १० वाजून २४ मिनिटांपर्यंत चालेल आणि त्यानंतर दशमी तिथी सुरु होईल. आज संध्याकाळी ४ वाजून ६ पर्यंत इंद्र योग राहील. आज बुधवारी दुपारी १२ वाजून १३ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र राहील त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र दिसेल. राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होणार असून १ वाजून ३० पर्यत असणार आहे. तर आज मेष ते मीनपैकी १२ राशींचा आजचा दिवस कसा असणार आहे जाणून घेऊ या…

१४ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख
From February 24 the luck of people born under this zodiac sign
२४ फेब्रुवारीपासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार! मंगळ होणार मार्गी, मिळणार पैसाच पैसा
Singh Rashi Bhavishya 2025 in Marathi
Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

मेष:- घरात उत्साहाचे वातावरण राहील. आवश्यक तेथेच बढाया मारा. भौतिक विकास होईल. एखादा नवीन करार होण्याची शक्यता. आरोग्यात सुधारणा होईल.

वृषभ:- कौटुंबिक खर्च वाढेल. घरात मानाची वागणूक मिळेल. कामातील नवीन योजनांवर भर द्यावा. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. मनोकामना पूर्णत्वास जाण्याचे योग.

मिथुन:- आपले मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा. करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा कराल. मानसिक शांतता व समाधान लाभेल. एखादे काम पूर्ण दिवस घेईल.

कर्क:- अति धाडसाने कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवाल. सृजनात्मक कार्यातील आवड वाढेल. हातातील कामात यश येईल. सहकारी संपूर्ण सहकार्य करतील.

सिंह:- समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करावा. मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल. दिनक्रम व्यस्त राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल.

कन्या:- अनाठायी खर्चाला बळी पडू नका. कामातील नवीन संधी शोधाव्यात. व्यावहारिक सावधानता बाळगावी. वाणी संयमित असावी. प्रेमातील व्यक्तींना नवीन उत्साह लाभेल.

तूळ:- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. जोडीदाराशी अति वाद टाळावा. आजचा दिवस लाभदायक. नवीन प्रकल्प हाती घेऊ शकता. एखादा जुना वाद संपुष्टात येईल.

वृश्चिक:- तुमची मते इतरांना मान्य होतील. अति तिखट पदार्थ टाळा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. नोकरदार वर्गाला दिलासादायक बातमी मिळेल.

धनू:- गूढ गोष्टींचे वाचन कराल. तुमचा सल्ला लोक ऐकतील. कामात जोखीम पत्करावी लागेल. नेहमीच्या कामात काहीसा बदल करून पाहावा. नवीन संधी हेरता आली पाहिजे.

मकर:- अति जड पदार्थ खाऊ नयेत. विनाकारण पैसे खर्च होतील. घरातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

कुंभ:- विद्यार्थांच्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराचे मत शांतपणे ऐकावे. संमिश्र घटनांचा दिवस. आहारावर नियंत्रण ठेवावे. कामे उरकण्याची घाई कराल.

मीन:- घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. जुने परिचित लोक भेटतील. व्यापारी वर्गाला सुखकारक दिवस. सामाजिक स्तरावर मान वाढेल. संयमाने समोरील समस्येचे निराकरण करू शकाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader