14th July Rashi Bhavishya & Panchang: १४ जुलै २०२४ ला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. रविवारच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी असणार आहे व त्यानंतर नवमीचा प्रारंभ होईल. १४ जुलैचा पूर्ण दिवस व पूर्ण रात्र तसेच सोमवारच्या सकाळी ७ वाजेपर्यंत सिद्ध योग असणार आहे. रविवारी रात्री उशिरा १० वाजून ७ मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे. १४ जुलैला दुर्गाष्टमी व्रत सुद्धा आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशींना कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया.
१४ जुलै पंचांग व राशी भविष्य
मेष:-समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. आनंद वार्ता कानी पडतील. जोडीदाराचे सौख्य वाढेल. अति उत्साह दाखवू नका. जुन्या मित्रांची चांगली साथ लाभेल.
वृषभ:-आर्थिक योजना गुप्ततेने कराव्यात. शहानिशा केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. नातेवाईक नाराज होऊ शकतात. डोळ्यांची काळजी घ्यावी. बोलण्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथुन:-योग्य शहानिशा केल्याशिवाय कामे करू नका. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. अनावश्यक खर्च टाळावेत. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.
कर्क:-संधीचे सोने करायला शिका. गृहीणींवरील ताण वाढू शकतो. कठोर परिश्रमाचे चीज होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा.
सिंह:-स्वत:चेच मत खरे करायला जाऊ नका. खेळकरपणे कामे हाताळाल. बौद्धिक ताण जाणवेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रलोभनापासून दूर राहावे.
कन्या:-मानसिक ताण बाजूला सारा. सकारात्मक विचारसरणीचा मार्ग धरावा. जवळच्या मित्राकडून आधार मिळेल. पालकांचे सहकार्य घ्यावे. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.
तूळ:-आवडी-निवडी वर अधिक खर्च कराल. आवडत्या छंदाला वेळ द्यावा. आजचा दिवस शुभ कारक. इतरांच्या चांगल्याचा विचार करावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
वृश्चिक:-मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मित्राला मदत कराल. प्रिय व्यक्तिला भेटण्याची ओढ वाटेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी घटना मन खिन्न करू शकते.
धनू:-रागावर नियंत्रण ठेवावे. नातेवाईकांची नाराजी सहन करावी लागेल. मुलांविषयी मनात नाराजी उत्पन्न होईल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे.
मकर:-स्वत:च स्वत:ची अवहेलना करू नका. जुनी कामे निघतील. कौटुंबिक शांतता जपावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे. आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराल.
कुंभ:-नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. बुद्धी आणि विवेक कमी लावावेत. जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल. भागीदारीत वर्चस्व दाखवाल.
हे ही वाचा<< कुंडलीवरून तुम्हाला कसा जोडीदार मिळणार हे कसे ओळखावे? लग्नानंतर कसे असेल जीवन? ज्योतिष अभ्यासक सांगतात..
मीन:-कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. जनसंपर्कात भर पडेल. मनोबल वृद्धिंगत होईल. स्वभावातील उधळेपणा ओळखावा. चटकन नाराजी दर्शवू नका.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर