March Grah Gochar 2024 Budhaditya yog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी गोचर करत असतो. काही ग्रह मुळातच संथ गतीने प्रवास करत असल्याने त्यांच्या राशी किंवा नक्षत्र परिवर्तनाला वेळ लागू शकतो. ज्या राशीत एखादा ग्रह प्रवेश घेईल त्यानुसार त्याचे अन्य राशीतील स्थान व प्रभाव बदलतो. आज म्हणजेच ७ मार्चला बुध ग्रह हा गुरुच्या स्वामित्वाच्या मीन राशीत प्रवेश घेणार असून सकाळी ९ वाजून २१ मिनिटांनी हे भ्रमण पूर्ण झाले आहे. यानंतर पुढील सात दिवसात लगेचच सूर्य देव सुद्धा मीन राशीत प्रवेश करत आहेत. १४ मार्चला दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी सूर्याचे मीन राशीत गोचर झाल्यावर बुध व सूर्याची युती निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात या दोन्ही ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व आहे. यातून निर्माण होणारा बुधादित्य राजयोग हा अत्यंत शुभ मानला जातो. विशेष म्हणजे मीन राशीत अशाप्रकारे बुधादित्य राजयोग जुळण्याची स्थिती तब्बल ३६५ दिवसांनी आली आहे. अर्थातच याचा शुभ प्रभाव काही राशींवर होऊ शकतो, यातुन फायदा मिळवू शकणाऱ्या राशी कोणत्या हे पाहूया..
बुधादित्य राजयोगाने ‘या’ राशींचे नशीब होईल जागृत
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
बुधादित्य राजयोगाने आपल्या नशिबाला लागलेले टाळे उघडू शकते. या कालावधीत आपल्याला नशिबाची साथ लाभल्याने महत्त्वाची कामे मार्गी लागतील. अनेक मार्गांनी आपल्याकडे सुख- शांती व समृद्धी येणार आहे. परदेशात प्रवासाचे किंवा स्थायिक होण्याचे स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांना या कालावधीत एखाद्या मोठ्या स्पर्धकाचा त्रास होऊ शकतो पण चतुराईने त्यांच्यावर मात करण्यासाठी सुद्धा तुमचे ग्रहबळ पाठिंबा देऊ शकते. बुध हा बुद्धीचा व सूर्य हा तेजाचा ग्रह मानला जात असल्याने या कालावधीत आपले बुद्धीबळ विकसित होईल ज्यातून आपण पैसे कमावण्यापासून ते गुंतवण्यापर्यंत अनेक प्रकारे स्वतःचा लाभ घडवून आणू शकता. आरोग्य सुद्धा उत्तम असेल.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
बुधादित्य राजयोग हा आपल्या कुंडलीत सप्तम स्थानी तयार होत असल्याने आपल्या मरगळलेल्या आयुष्यात नवीन चेतना येईल. लग्नाचे योग आहेत तसेच विवाहित मंडळींना या कालावधीत आपल्या जोडीदारासह आनंद अनुभवता येईल. संतती प्राप्तीचे योग आहेत. कन्या राशीच्या कुंडलीत बृहस्पतीची कृपादृष्टी सुद्धा असल्याने आपल्याला आरोग्याच्या बाबत अगदी लाभदायक अशी ही वेळ असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आपले शब्द आपला मान वाढवतील याची खात्री करा. परदेशी कंपनीसह काम करण्याची संधी आहे. व्यापारात सुद्धा काही पाऊले मागे येऊन मोठी झेप घेता येईल, एकूण आर्थिक स्थिती उत्तम असेल.
हे ही वाचा<< ३० वर्षांनी शनीने महायुती केल्याने ‘या’ राशींचे आयुष्य होईल कुशल मंगल! प्रेम, पैसे, प्रपंच, कशी असेल कुंडली?
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)
बुधादित्य राजयोग आपल्या राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. हा योग आपल्या राशीच्या धन व वाणीच्या स्थानी तयार होत आहे. या कालावधीत आपल्याला अनपेक्षित व अचानक धनलाभाचे योग आहेत. आपला बँक बॅलन्स वाढू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने आपले समाजातील स्थान व मान-सन्मान सुद्धा द्विगुणित होईल. वाडवडिलांच्या संपत्तीचा फायदा होऊ शकतो गुंतवणुकीला पर्याय शोधू नका. पोटाचे आरोग्य जपावे लागेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)