Surya Grahan Chandra Grahan 2023: ज्योतिषशास्त्रात सूर्य व चंद्र ग्रहणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या दोन्ही ग्रहणांचा प्रभाव मानवी जीवनावर होत असल्याचे मानले जाते. यंदाच्या वर्षी तब्बल चार वेळा सूर्य व चंद्र ग्रहण लागणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात १५ दिवसात दोन वेळा ग्रहण लागणार आहे. १४ ऑक्टोबरला सूर्य ग्रहण तर २८ ऑक्टोबरला चंद्र ग्रहण असणार आहे. १५ दिवसांच्या कालावधीत दोनदा ग्रहण लागल्याने याचा प्रभाव १२ राशींवर नक्कीच कमी अधिक प्रमाणात दिसून येऊ शकतो. हिंदू धर्मात ग्रहण लागणे हे मुळात अशुभ मानले जात असले तरी यामुळे काही राशींना येत्या काळात मोठा लाभ होण्याची चिन्हे आहेत. मुळात ग्रहणाची तिथी व वेळ काय आहे, तसेच तुमच्या राशीवर ग्रहणाचा शुभ प्रभाव असणार आहे का, असल्यास तुम्हाला नेमका कसा फायदा होऊ शकतो याविषयी सविस्तर जाणून घेऊया…
सूर्य व चंद्र ग्रहणाने या राशींचे भाग्य उजळणार?
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीसाठी दोन्ही ग्रहणांचा प्रभाव हा लाभदायक असणार आहे. या कालावधीत तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरमध्ये उंच उडी घेता येईल कारण तुमच्या भाग्यात नोकरी बदलाचे संकेत दिसून येत आहेत. तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतींमध्ये अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करू शकणार आहात. येत्या काळात तुमच्यावरील जबाबदारीचे ओझे वाढेल पण तुम्हाला यातून खूप कौतुक व प्रचंड पैसा कमावता येणार आहे.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
सिंह राशीसाठी सूर्य व चंद्र ग्रहण हे फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही केलेली गुंतवणूकच आता दुप्पटीने तुमच्याकडे परत येऊ शकते. कर्माचे फळ तुम्ही केलेल्या कृतीनुरूप मिळेल. कर्जातून मुक्त होऊ शकता. प्रेम संबंध सुधारतील व वैवाहिक जीवनातील कटुता दूर होण्यास मदत होऊ शकते.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
तूळ राशीसाठी ग्रहण सुखाची व समृद्धीची भेट घेऊन येणार आहे. या काळात तुमचा पगार वाढणार असल्याची चिन्हे आहेत. आर्थिक मिळकत वाढल्याने स्वतःचे व तुमच्या माध्यमातून इतरांची सुद्धा काही स्वप्न पूर्ण करू शकता. अनंत चतुर्दशीपासूनच तुमच्या राशीचा शुभ काळ सुरु होत आहे ज्यामध्ये ग्रहण काळानंतर प्रगती व धनलाभाला वेग मिळण्याची चिन्हे आहेत.
हे ही वाचा<< १११३ वर्षांनी गुरुदेव ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत भाग्यस्थानी; श्रीमंतीसह दिवाळी आधी मिळेल लाडू- करंजीचा गोडवा
सूर्य व चंद्र ग्रहणाची तारीख व वेळ (Solar Eclipse 2023, Lunar Eclipse 2023)
२०२३ मधील शेवटचे सूर्य ग्रहण १४ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी सुरु होणार आहे तर मध्यरात्री २ वाजून २५ मिनिटांनी ग्रहण कालावधी संपुष्टात येईल. तर चंद्र ग्रहण हे २९ ऑक्टोबरला रात्री १ वाजून ६ मिनिटांनी सुरु होणार आहे व मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांनी ग्रहण अवधी संपेल. २०२३ मधील सर्व ग्रहणांपैकी केवळ हे एकच चंद्र ग्रहण भारतातून पाहायला मिळणार आहे व म्हणूनच याचा सुतक काळ सुद्धा पाळला जाईल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)