15th August 2024 Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज १५ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. गुरुवारी दशमी तिथी सकाळी १० वाजून २७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर एकादशी तिथी सुरु होईल. तर दुपारी २ वाजून ५८ पर्यंत वैधृती योग राहील. तसेच ज्येष्ठा नक्षत्र दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील. आज राहू काळ दुपारी १ पासून ३० मिनिटांपर्यंत सुरु होईल ३ वाजेपर्यंत असेल. तर आजचा दिवस मेष ते मीन राशीचा कसा जाणार आहे हे आपण जाणून घेऊ…

१५ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
What Uday Samant Said?
Uday Samant : उदय सामंत यांच्या हाती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची अधिसूचना; म्हणाले, “आज अत्यंत आनंदाचा दिवस..”
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा

मेष:- काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका. व्यायामाचा कंटाळा करू नका. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थ्यानी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा.

वृषभ:- बोलण्यातील कटुता टाळा. जुन्या पुस्तकांचे वाचन कराल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. शासकीय गोष्टींना मान्यता मिळेल. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे.

मिथुन:- बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडाल. सरकारी कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

कर्क:- उत्तम वाहन सौख्य लाभेल. शांत विचाराने कामे पूर्ण करा. मुलां प्रतीच्या जबाबदार्‍या पार पाडाल. कामा निमित्त छोटे प्रवास घडतील. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.

सिंह:- आपल्या निर्णयावर ठाम राहाल. नम्रपणे बोलून आपला मान राखाल. राजकीय संपर्कातून लाभ होईल. जोडीदाराची मानसिकता समजून घ्या. धाकट्या भावंडाचे सहकार्य लाभेल.

कन्या:- कामाचा ताण वाढता राहील. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या शोधात असणार्‍यांना दिलासादायक दिवस. व्यवसायिकांना संपर्कातून लाभ होईल. उत्तम स्त्री सौख्य लाभेल.

तूळ:- आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जवळचा प्रवास घडेल. हसत खेळत वागणे ठेवाल. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक:- नातेवाईकांना नाराज करू नका. दिवस माध्यम फलदायी असेल. आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी. बोलण्यात माधुर्य ठेवल्यास कामे सुरळीत पार पडतील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे.

धनू:- नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. विरोधक नरमाईची भूमिका घेतील. नवीन व्यावसायिक संपर्क लाभदायक ठरतील. सासरच्या मंडळींकडून लाभ होतील.

मकर:- समोरच्या व्यक्तीची साशंकता दूर कराल. आहाराची पथ्ये पाळावीत. धार्मिक बाजू भक्कम कराल. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील.

कुंभ:- नवीन ओळखी वाढवाव्यात. भागीदारीतील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या. मनातील इच्छा पूर्ण होतील. संयमाने कार्यरत राहाल. अचानक प्रवास संभवतो.

मीन:- जुनी व्यावसायिक कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्च दूर ठेवा. मुलांच्या जबाबदार्‍या पार पडण्यात दिवस निघून जातील. काही कुरबुरी चर्चेतून दूर कराव्यात. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader