15th October Rashi Bhavishya & Panchang : आज १५ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी रात्री १२ वाजून २० मिनिटांपर्यंत राहील. तर दुपारी २ वाजून १४ मिनिटांपर्यंत वृद्धी योग जुळून येईल. तसेच पूर्वा भाद्रपद नक्षत्र रात्री १० वाजून ०९ मिनिटांपर्यंत जागृत असेल. त्याचबरोबर आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यत असेल.

याशिवाय आज मंगळवारी भौम प्रदोष व्रत करण्यात येणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष व शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जातात. त्याचबरोबर मंगळवारी येणारा प्रदोष भौम प्रदोष म्हणून ओळखला जातो.तर आज मेष ते मीनचा कुंडलीत कोणत्या पद्धतीने सुख येणार आहे हे आपण जाणून घेऊ…

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Budh Uday In Scorpio 2024 horoscope 2025
Budh Uday 2024 : ९ तासांनंतर बुध उदयाने एका झटक्यात ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही व्हाल कोट्यधीश?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

१५ ऑक्टोबर पंचाग व राशिभविष्य :

मेष:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकातील एकोपा वाढीस लागेल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.

वृषभ:- कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. सहकारी वर्गाशी सलोखा वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. मात्र काही संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.

मिथुन:- प्रेम सौख्यात वाढ होईल. गायन कलेला योग्य दाद मिळेल. आवडते छंद जोपासले जातील. करमणुकीत अधिक काळ रमाल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील.

कर्क:- घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. मानसिक चलबिचलता जाणवेल. काही गोष्टी आपल्याला विस्मित करतील. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

सिंह:- नातलगांशी जवळीक वाढेल. प्रवासाची हौस भागवता येईल. चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल. हातून एखादे सत्कार्य घडेल. हस्त कलेचे कौतुक केले जाईल.

कन्या:- आपली इतरांवर छाप पडेल. गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल. आर्थिक बाजू सुधारेल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

तूळ:- सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

वृश्चिक:- काही बाबीत पिछेहाट झाल्यासारखे वाटू शकते. आपली जिद्द वी चिकाटी कायम ठेवावी लागेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. सूर्याची उपासना करावी.

धनू:- हातातील कामात यश येईल. मनोकामना पूर्ण होईल. आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल उचलावे.

मकर:- मनातील निराशाजनक विचार दूर सारावेत. जुन्या गोष्टी आठवून खट्टू होऊ नका. मानसिक सौख्याला प्राधान्य द्यावे. आर्थिक बाजू सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका.

कुंभ:- इतरांना स्वखुशीने मदत कराल. परोपकारी वृत्तीत वाढ होईल. चांगली संगत लाभेल. ऐषारामाच्या साधनांची खरेदी कराल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

मीन:- मानसिक चंचलता जाणवेल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. चांगला धनलाभ संभवतो. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. हातातील कामात यश येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader