Budh Gochar Makes Bhadra Rajyog: बुद्धी व वैभवदाता बुध ग्रह पुढील १६ दिवसांनी म्हणजेच गणेशोत्सवाच्या नंतर कन्या राशीत गोचर करून प्रवेश करणार आहेत. १ ऑक्टोबरला हे गोचर पूर्ण होताच बुधग्रहाच्या कक्षेतील ग्रहांच्या स्थितीनुसार तीन मोठे राजयोग सुद्धा तयार होणार आहेत. यावेळी कन्या राशीतील सूर्याचा प्रभाव असल्याने बुधादित्य राजयोग तर कन्या राशीत चंद्र व बुध प्रभाव एकत्र झाल्याने भद्र राजयोग निर्माण होणार आहे. रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी कन्या राशीतील भद्र राजयोगाचा प्रभाव सुरु होईल तर दसऱ्यापर्यंत हा प्रभाव कायम राहणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र हा कन्या किंवा मिथुन राशीच्या १,४, ७, किंवा १० व्या स्थानी प्रभावी असतो तेव्हा त्यातून भद्र राजयोग तयार होतो. येत्या काळात भद्र राजयोग बनल्याने तीन राशींच्या नशिबाचे दार उघडण्याची चिन्हे आहेत. स्वतः वैभवलक्ष्मी सोनपावलांनी या राशींच्या मंडळीनाच्या घरी धन- धान्य व समृद्धी आणू शकते. या नशीबवान राशींमध्ये तुमचाही समावेश आहे का हे पाहूया..
भद्र राजयोग बनल्याने दसऱ्यापर्यंत ‘या’ राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभाचे योग
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीत बुधदेव हे पहिल्या आणि चौथ्या स्थानाचे स्वामी आहेत. कन्या राशीत सुद्धा बुधदेव चौथ्याच स्थानी स्थिर असणार आहेत. भद्र राजयोग बनल्याने तुम्हाला नवनवीन आर्थिक गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभू शकते. तुम्ही जर एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही वेळ लाभदायक ठरू शकते. पुढील महिन्याभराचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. तुमचे असे काही संपर्क होतील जे तुम्हाला भविष्यात कामी येऊ शकतात.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत भद्र राजयोग दुसऱ्या स्थानी तयार होत आहे. हा कालावधी तुमच्या इच्छापूर्तीचा असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत आणि कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करता येऊ शकतो. व्यवसायात एखादी मोठी झेप घेता येऊ शकते ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. काही प्रमाणात खर्चात वाढ होऊ शकते त्यामुळे बचतीकडे लक्ष द्यायला हवं.
हे ही वाचा<< ५ दिवसांनी शनी व बुध १८० अंशात आमनेसामने! ‘या’ ४ राशींची मंडळी नशीब चमकून होऊ शकतात करोडपती
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
कन्या राशीतच मुळात भद्र राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे पहिल्याच स्थानी राजयोग प्रभावी असल्याने भरभराट होऊ शकतात. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात पण त्यात थोडा रेंगाळलेपणा येऊ शकतो. कन्या राशीला विवाहाचे योग आहेत. दसऱ्यापर्यंत तुमच्या कामाच्या व प्रेमाच्या मार्गातील अडथळा दूर होऊ शकतो त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत तुम्हाला दोन्ही गोष्टींचे पुरेपूर लाभ होऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)