16th August Horoscope Marathi : आज १६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी शुक्रवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत असेल. तर आज शुक्रवारी मूळ नक्षत्र दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय आज पुत्रदा एकादशी व्रत आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. आज राहू काळ सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. तर आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

१६ ऑगस्ट पंचांग व राशिभविष्य :

Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
7 January Horoscope In Marathi
शाकंभरी नवरात्रोत्सव, ७ जानेवारी पंचांग: १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख, शांती आणि वैभव; तुमच्या मनोकामना पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य

मेष:- स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. जुने करार मार्गी लागतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

वृषभ:- अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. नवीन योजनेवर काम चालू करावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. सामाजिक बांधीलकी जपावी.

मिथुन:- आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक गोष्टी करण्यावर भर द्यावा. अति विचारात अडकून पडू नका. वरिष्ठ सहकार्‍यांचे चांगले सहकार्य लाभेल.

कर्क:- अति चौकसपणा दाखवू नका. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.

सिंह:- आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल.

कन्या:- आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा. कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

तूळ:- हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा. तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल.

वृश्चिक:- जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. अति मसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल.

धनू:- कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मकर:- हातातील कामांची यादी पूर्ण होईल. घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कुंभ:- कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी मतभेद दूर होतील.

मीन:- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader