16th June Panchang & Rashi Bhavishya Marathi: १६ जून २०२४ ला ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. रविवारच्या दिवशी पूर्ण दिवस व सोमवारी सकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत दशमी तिथी कायम असणार आहे. १६ जूनला रात्री ९ वाजून ४ मिनिटांपर्यंत वरियन योग कायम असणार आहे. रविवारच्या मध्यान्हापर्यंत हस्त नक्षत्र व त्यानंतर चित्रा नक्षत्र जागृत असेल. १६ जूनला मिथुन राशीतील सूर्य, बुध व शुक्राच्या युतीने तयार झालेला त्रिगही योग व गंगा दशहरा (दसऱ्याचा) योगायोग १२ राशींच्या भविष्यावर प्रभावी असेल. १६ जूनचे मेष ते मीन राशीचे भविष्य पाहा

१६ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-करमणुकीत अधिक वेळ घालवाल. सकस आहार घ्यावा. सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका. कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

Guru Margi 2025
३ दिवसानंतर ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, गुरूच्या कृपेने मिळेल अपार पैसा, धन- संपत्ती अन् यश
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
Guru Margi 2025 Jupiter Margi in Taurus
Guru Margi 2025 : वसंत पंचमीनंतर चमकणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; गुरूच्या आशीर्वादाने होऊ शकता प्रचंड श्रीमंत

वृषभ:-घरगुती वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जबाबदारी उत्तम रित्या पेलू शकाल. कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल. विलंबित कामे पूर्ण होऊ शकतील.

मिथुन:-आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. काही कामे रखडल्यासारखी वाटू शकतात. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. पत्नीची आपल्याला उत्तम साथ मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

कर्क:-व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करण्यासारखा वाटू शकतो. अती आवश्यक असेल तरच प्रवास करावा.

सिंह:-दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कामात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दूरच्या लोकांशी योग्य वेळी संपर्क साधला जाईल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

कन्या:-मतभेदा पासून चार हात दूर रहा. विचारांना योग्य दिशा द्यावी. नवीन योजना तयार ठेवाव्यात. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे.

तूळ:-दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल. केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जुन्या कामातून अचानक लाभ संभवतो. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

वृश्चिक:-क्रोध भावनेला आवर घालावा. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सन्मानास पात्र व्हाल. योग्य संधीसाठी थोडा धीर धरावा. काही कामे तुमचा कस पाहू शकतील.

धनू:-कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आततायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. दुचाकी वाहन चालवताना सतर्क रहा. मनातील परोपकाराची जाणीव जागृत ठेवा.

मकर:-अचानक धनलाभाची शक्यता. मनात नसत्या शंका आणू नका. भावंडांशी खटके उडण्याची शक्यता. प्रेमप्रकरणातील गोडी वाढेल. आरोग्यात काहीशी सुधारणा दिसून येईल.

कुंभ:-नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा. जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीतून चांगली कमाई करता येईल. बोलतांना संयम बाळगा.

हे ही वाचा<< २१ की २२ जून, वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी आहे? ३ मोठे राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या आर्थिक, वैवाहिक जीवनात येईल सुख

मीन:-कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सहकार्‍याकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता. कलेचा मनमुराद आनंद लुटता येईल. छंद जोपासायला वेळ काढा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader