Daily Horoscope For All Zodiac Sign’s : आज १७ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी मंगळवारी सकाळी १० वाजून ५७ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी १० वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्रिपुष्कर योग राहील आणि ब्रह्मयोग रात्री ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत पुनर्वसु नक्षत्र राहील. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. ग्रहांच्या स्थान बदलामुळे विविध योग जुळून येत आहेत. त्यातीलच एक योग म्हणजे त्रिपुष्कर योग होय. हा योग राशीचक्रातील काही राशींसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तर त्रिपुष्कर योग कोणत्या मेष ते मीनपैकी कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरेल जाणून घेऊया…

१७ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा आयुष्यात होतील मोठे बदल! सोमवारी तुमचे नशीब चमकणार का?
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार
Budh Uday 2024 The luck of these zodiac signs will shine from December 12th Mercury will bring be happiness in this life
१२ डिसेंबरपासून या राशींचे नशीब चमकणार! बुद्धीचा दाता बुधचा होईल उदय, ‘या’ जीवनात होईल आनंदी आनंद

वृषभ:- तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल.

मिथुन:- नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.

कर्क:- हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह:- सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.

कन्या:-आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.

तूळ:- योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.

वृश्चिक:- लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

धनू:- सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील.

मकर:- मन:शांति लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

कुंभ:- नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन:- बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader