17th August Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज १७ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी सकाळी ८ वाजून ०६ मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. शनिवारी सकाळी १० वाजवून ४७ मिनिटांपर्यंत प्रीति योग राहील. तर आजच्या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्र दिसेल. त्यानंतर अधोमुख नक्षत्र राहील. राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होईल १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याशिवाय १७ ऑगस्टला आजच्या दिवशी शनिप्रदोष व्रत सुद्धा असणार आहे. हा व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत असे म्हंटले जाते. तर मेष ते मीन राशींचा आजचा दिवस कसा जाईल ? कोणत्या राशीवर असणार शनिदेवाची कृपा? जाणून घेऊ या…

१७ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. दुसर्‍यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबा समवेत वेळ उत्तमपणे घालवाल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल.

वृषभ:- कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे. जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा.

मिथुन:- हट्टीपणे वागू नका. बुद्धिमत्तेचे दर्शन घडवा. अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका. कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घ्या.

कर्क:- भागीदारीत फायदा होईल. खेळ आणि आरामात बराच काळ घालवाल. अनेक कामे अंगावर पडू शकतात. जबाबदार्‍यांचा ताळमेळ सांभाळावा. शक्यतो वादविवादात पडू नका.

सिंह:- दुसर्‍यास समजून सांगण्याची हातोटी निर्माण कराल. निराशेचे बळी होऊ नका. वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. कुटुंबात मान सन्मान प्राप्त होतील.

कन्या:- भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करू नका. अति कामाचा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळ:- इतरांशी व्यवहाराने वागाल. समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा. कामावर लक्ष केन्द्रित करावे. प्रिय व्यक्तीचा रूसवा दूर करावा लागेल.

वृश्चिक:- अति साहस करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दुसर्‍याची मानसिकता समजून घ्या. जबाबदारी पार पडताना थकून चालणार नाही. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

धनू:- तुमच्या प्रेमळ स्वभावाचा गैर फायदा घेऊ देऊ नका. तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. नियोजनाने वाटचाल करावी. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर:- शांतता व संयम बाळगा. आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा. दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाईलाजाने करावी लागतील. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी.

कुंभ:- गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल. नवीन लोकांशी मैत्री कराल. सकारात्मक विचार करावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. प्रवासात सावधानता बाळगा.

मीन:- दिवस उत्साहात व आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे योग. जोडीदाराची प्रगति होईल. परदेशात जाण्याची संधी चालून येईल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17th august 2024 shanivar rashi bhavishya shanipradosh shravan shukla paksha dwadashi tithi will get mesh to mean zodiac signs luck today daily horoscope in marathi asp