17 May Panchang & Rashi Bhavishya: १७ मे २०२४ ला वैशाख शुल्क पक्षातील नवमी व दशमी तिथी एकत्र असणार आहे. उदया तिथीनुसार आज नवमी व शुक्रवार असणार आहे. पण सकाळी ८ वाजून ४९ मिनिटानंतर दशमी तिथीचा प्रारंभ होईल. १७ मेच्या सकाळी ९ वाजून २३ मिनिटांपासून ते उद्या १८ मे ला सकाळची ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत हर्षण योग कायम असणार आहे. तसेच शुक्रवारी रात्री ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत आज फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशींपैकी कुणाच्या नशिबात प्रेम व धनाची वर्षा बरसणार हे पाहूया..
१७ मे पंचांग व राशी भविष्य
मेष:-दिवस कौटुंबिक कामात जाईल. उत्तम मानसिक सौख्य लाभेल. भावंडांविषयीचे गैरसमज मनातून काढून टाका. अनाठायी खर्च केला जाईल. मित्रांशी वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
वृषभ:-जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. व्यावसायिक लाभाने संतुष्ट राहाल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. प्रवास मजेत होईल.
मिथुन:-संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. आवडते पदार्थ खायला मिळतील. दिवस कुटुंबासमवेत मजेत जाईल. विचारणा योग्य दिशा द्यावी. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
कर्क:-आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. जोडीदाराच्या वागण्याच्या अचंबा वाटेल. उष्णतेचे विकार संभवतात. हितशत्रूंकडे लक्ष द्यावे.
सिंह:-विरोधकांचा विरोध मावळेल. मानसिक चंचलतेवर विजय मिळवा. नवीन लोक संपर्कात येतील. पत्नीशी वाद वाढवू नयेत. कामात चांगली स्थिरता येईल.
कन्या:-मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडत्या वस्तूंची खरेदी केली जाईल. मित्र परिवारात वाढ होईल. तुमची समाजप्रियता वाढेल. कामात वडीलांचे सहकार्य घेता येईल.
तूळ:-दिवसभर कामात व्यग्र राहाल. थोरांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. व्यावसायिक ठिकाणी मान वाढेल. काही कामे उगाचच अडकून पडतील.
वृश्चिक:-धार्मिक कामात मदत कराल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. एखादी नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळा.
धनू:-अचानक धनलाभ संभवतो. कमी श्रमात कामे पूर्ण होतील. महत्त्वाची कामे पुढे सरकतील. अती विचार करू नका.
मकर:-जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. दिवस कौटुंबिक सौख्यात जाईल. सकारात्मक विचार करावेत. रागावर नियंत्रण ठेवा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
कुंभ:-हाताखालील नोकरांकडून कामे वेळेत पूर्ण होतील. दिवसभरातील कामाने समाधानी राहाल. क्षुल्लक गोष्टीने चीडू नका. बाग कामात मन रमवावे. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात.
हे ही वाचा<< ४५ दिवसांनी शनी १८० अंशात वळणार; ‘या’ राशींना नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रचंड श्रीमंतीची संधी; घरातील भांडण होईल दूर
मीन:-मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. जुगारातून धनलाभ संभवतो. हस्त कौशल्याला प्राधान्य द्यावे. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर