Aries To Pisces Horoscope Today : १८ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथीला उद्या सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. आज चित्रा नक्षत्र ७ वाजून ३४ मिनिटांनी जागृत असेल तर गंड योग ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत जुळून येईल. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर आजचा दिवस मेष ते मीनसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

१८ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope) :

मेष:- व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल. योग्य नियोजनावर भर द्यावा. नवीन गोष्टींची चाहुल लागेल. प्रवासावर खर्च होईल. बौद्धिक कौशल्य पणाला लागेल.

वृषभ:- व्यवहार सजगतेने करावा. मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कृतीत प्रामाणिकपणा ठेवावा. मानसिक स्थिरता बाळगावी.

मिथुन:- उष्णतेच्या आजारांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया ओळखा. सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल. तुटपुंज्या ज्ञानावर खुश होऊ नका. सुप्त चळवळेपणा कामाला लावा.

कर्क:- कामाची घाई करू नका. अति लोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नाला यश येईल. मोठ्या गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धार्मिक सहलीचे नियोजन कराल.

सिंह:- खेळाडूंना चांगली संधी मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्णत्त्वाला जातील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. आळस झटकून कामाला लागावे. विरोधक माघार घेतील.

कन्या:- घरातील वातावरण शांत ठेवावे. स्थावरच्या कामात लक्ष घाला. व्यावसायिक संघर्ष लक्षात घ्यावा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.

तूळ:- वैवाहिक सौख्यात रमाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. यश डोक्यात जाऊ देऊ नका. कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. सोपविलेले काम धडाडीने पूर्ण कराल.

वृश्चिक:- संमिश्र परिस्थिती लक्षात घ्यावी. सरकारी मदत मिळू शकेल. प्रलोभनापासून दूर राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्याव्यात.

धनू:- घरगुती खर्चावर लक्ष ठेवा. बाह्यरुपावर भुलू नका. मैत्रीपूर्ण प्रेम वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

मकर:- वडीलधार्‍यांचा योग्य पाहुणचार करावा. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. एकांत टाळण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात. उधारीचे व्यवहार टाळावेत.

कुंभ:- कामाचा व्याप लक्षात घ्यावा. कलागुणांना वाव द्यावा. दानधर्मावर खर्च कराल. कागदपत्रे जपून ठेवावीत. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.

मीन:- आवडत्या लोकांच्यात रमून जाल. बोलण्यात मधाळपणा जपाल. कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 february 2025 rashi bhavishya aries to pisces which zodiac signs get rid of family conflicts read horoscope in marathi asp