Today Horoscope in Marathi: १८ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी रविवारी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज १ वाजून १६ मिनिटांपर्यंत शोभन योग जुळून येईल. शुभ कार्य आणि प्रवासासाठी शोभन योग उत्तम मानला जातो. या योगात सुरू झालेला प्रवास सुखदायक असतो . वाटेत कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाही. जी इच्छा मनात बाळगून प्रवास कराल ती देखील पूर्ण होते, असे मानले जाते. त्याचप्रमाणे आज २ वाजून ५२ मिनिटांपर्यंत पूर्वाफाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच आज राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात शोभन योग बनल्याने आज १२ राशींना दिवस कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…

१८ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today) :

मेष:- तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

16 January 2025 panchang and rashi bhavishya
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा
Mangal Margi 2025 horoscope
२१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे झटक्यात पालटणार नशीब; मंगळ मार्गीमुळे मिळणार बक्कळ पैसा, संपती, जबरदस्त यश
When will the solar and lunar eclipses
वर्ष २०२५मध्ये केव्हा लागणार सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहण! जाणून घ्या तारीख आणि भारतात कधी दिसणार की नाही?

वृषभ:- कौटुंबिक वादात पडू नका. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे.

मिथुन:- आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यवसईकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

कर्क:- आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयि गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह:- मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या:- व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका.

तूळ:- आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

वृश्चिक:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

धनू:- जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर:- लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ:- भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलताना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन:- स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader