Rahu-Budh Yuti 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या गोचराचा त्याच्या स्वामित्वाच्या राशींसह अन्य राशींवर सुद्धा स्थितीनुसार प्रभाव पडत असतो. या महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार अशी ओळख असलेला बुध ग्रह गोचर करून ७ मार्च मीन राशीत स्थिर झाला आहे. मीन राशीत अगोदरच राहू ग्रह विराजमान आहे. राहू व बुधाची ही युती एक दोन नव्हे तर तब्बल १८ वर्षांनी होत आहे. या मिलनामुळे १२ राशींमधील चार राशींचे नशीब रातोरात कलाटणी घेणार असल्याचे दिसतेय. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी प्रभावित राशींच्या आयुष्य अपार धन- संपत्ती, मान- सन्मान आणू शकतो. बुधाचे पुढील गोचर होईपर्यंत ही स्थिती कायम असणार आहे तोपर्यंत नेमक्या कोणत्या राशींना लक्ष्मीच्या रूपात बुध व राहुचा प्रभाव अनुभवता येणार हे पाहूया.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
मीन राशीत असणारे बुध व राहू कर्क राशीच्या मंडळींना प्रचंड फायदा देऊ शकतात. धनलाभाचे योग तयार होत आहेत. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा सुधारू शकते. विशेषतः व्यवसायात आपल्याला हव्या तशा गोष्टी घडून येऊ शकतात. तुमच्या कर्मभावी ही युती प्रभावी असणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्याच कामातून लाभ किंवा तोटा होऊ शकतो. वैवाहिक आयुष्यात मात्र निश्चित काही सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. नात्यातील आपुलकी व गोडवा वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी पगारवाढीसाठी आपल्याला आपल्या वाणीचा वापर नीट करणे आवश्यक असणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
बुध व राहूचे मिलन वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी शुभ असणार आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रता लाभेल ज्याचा शुभ परिणाम तुम्हाला येत्या परीक्षांमध्ये पाहायला मिळू शकतो. आर्थिक मिळकतीचे प्रमाण वाढण्यासाठी स्रोत वाढवणे गरजेचे ठरेल असे केल्यास तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक नाते संबंध सुधारतील. तुम्ही कुटुंबासह एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकता. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. बाहेर खाणे टाळावे.
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
मकर राशीच्या मंडळींसाठी मीनमध्ये राहू व बुधाची युती झाल्याने अनुकूल कालावधी सुरु होईल. नोकरदार मंडळींना वरिष्ठांकडून प्रशंसा ऐकायला मिळेल. व्यावसायिकांना नव्या कामाच्या संपर्कांसह मोठमोठया डील्स पूर्ण करता येऊ शकतात. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो मात्र शेअर बाजार किंवा अन्य जोखमीच्या मार्गाने पैसे गुंतवताना तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो. जुन्या आजारांपासून सुटका मिळू शकते. दुखणी अंगावर काढू नका.
हे ही वाचा<< १७ मार्चपर्यंत ‘या’ ५ राशींना शनी देणार धनसंपत्ती व प्रचंड यश; येत्या आठवड्यात तुमच्या राशीचा श्रीमंतीचा मार्ग कोणता?
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
मीन राशीच्या मंडळींना या कालावधीत नशिबाची साथ मिळणार आहे. कुटुंबाबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी भरघोस यशासह पदोन्नती मिळू शकते. तुमचे मन कामात व्यस्त राहील.बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. दीर्घकाळ चाललेले वादविवाद संपतील. या कालावधीत आपल्याला आपले स्पर्धक व शत्रू दोघांनाही नीट ओळखणे व त्यानुसार वागवणे आवश्यक आहे. धनप्राप्तीसाठी पूर्वगुंतवणूक कामी येईल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)