Shani Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे बदल हे राशी चक्रावर विविध स्वरूपात प्रभावी ठरत असतात. काही ग्रहांचा प्रभाव हा स्पष्ट दिसून येतो तर काही ग्रहांचा प्रभाव अप्रत्यक्षरीत्या आपल्या आयुष्यात बदल घडवून आणत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या बदलांना अधिक महत्त्व आहे. याचे कारण म्हणजे शनी हा कलियुगातील न्यायदेवता व कर्मदेवता म्हणून ओळखला जातो. यामुळेच शनीच्या चालीमध्ये किंचित बदल झाल्यास १२ राशींवर कमी- अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येतो. शनी हा मुळातच अत्यंत संथ गतीने चालणारा ग्रह आहे. एखाद्या राशीत शनीने प्रवेश घेतल्यास तो किमान अडीच तर जास्तीत जास्त साडेसात वर्षे तिथे वास्तव्य करतो. येत्या सात दिवसांमध्ये शनीचा कुंभ राशीतच उदय होणार आहे. १८ मार्चपासून शनीचं बळ वाढून ५ राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल होणे अपेक्षित आहे. या पाच राशी कोणत्या व त्यांना लाभ होणार की नुकसान हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ मार्चला उदय होताच शनी होणार पॉवरफुल; ‘या’ राशींच्या नशिबाचं होईल सोनं

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीचं मंडळींसाठी शनीचा उदय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये सुधारणा होईल. आई वडिलांच्या साथीने तुम्ही जुन्या व मोठ्या संकटावर मात करू शकणार आहात. समाजातील मान- सन्मान वाढू शकतो. आजारांपासून सुटका मिळू शकते. शनीच्या कृपेने घरी- दारी सुख व शांतीचा वास असेल. यामुळेच लक्ष्मीची सुद्धा तुमच्यावर कृपा होऊ शकते.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीच्या मंडळींसाठी शनी उदय हा फायदेशीर असू शकतो. धनलाभाचे सुद्धा विशेष योग तयार होत आहेत. यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुम्हाला अडकून पडलेले किंवा उधार दिलेले पैसे न मागता अचानक परत मिळाल्याने अचानक नाती व आर्थिक स्थिती दोन्ही सुधारू शकतात. वैवाहिक समस्यांवर जोडीदाराच्या मदतीने मात करू शकणार आहात. पती- पत्नीला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मागील वर्षी शनीच्या साडेसातीतुन मुक्त झालेली मिथुन रास ही शनीच्या उदयानंतरच्या प्रभावाने समृद्ध होऊ शकते. नोकरदार मंडळींसाठी हा कालावधी लाभदायक ठरेल. तुमच्या वाटेतील अडथळे दूर होतील. नोकरी बदलाचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारल्यावर खर्च व गुंतवणुकीचा ताळमेळ नीट बसवा. वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी काही टप्पे पुढे जाऊ शकता. आरोग्यात सुधारणा झाल्याने कामाची ऊर्जा वाढेल. जुन्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागतील.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या उदयानंतर अच्छे दिनच सुरु होणार आहेत. कामात येणारे अडथळे दूर होतील व प्रगतीच्या पथावर काही पाऊले पुढे जाऊ शकता. नवनवीन डील्स पूर्ण होतील, बेरोजगारांना किंवा नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या कालावधीत यश लाभू शकते. एखादी चांगली बातमी कानावर आल्याने पुढील महिनाभराचा कालावधी तरी आनंदी आनंद अनुभवाल. पगारवाढीचा योग तुमच्या भविष्यात दिसत आहे.

हे ही वाचा<< १८ वर्षांनी राहू बुध ‘या’ राशीत एकत्र आल्याने ४ राशींचे वाईट दिवस संपणार; धनलाभासह मिळेल नशिबाला कलाटणी

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीतच शनीचा उदय होत असल्याने प्रभाव हा अत्यंत शक्तिशाली असणार आहे. शनी हे मुळातच कुंभेचे स्वामी आहेत त्यामुळे शनी महाराज या कालावधीत कुंभ राशीच्या मंडळींना लाभाची स्थिती अनुभवायला देऊ शकतात. हा लाभ विशेषतः धन व संधींच्या रूपात असेल. व्यापाऱ्यांना किंवा एखाद्या व्यवसायात कमी-अधिक गुंतवणूक केलेल्या मंडळींना दुपट्टीने फायदा होऊ शकतो. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा हौल. कुटुंबात तुमचे स्थान अगदी महत्त्वाचे होऊ शकते. लग्नासाठी स्थळ चालून येऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18th march before chandra grahan holi saturn becomes extreme powerful mesh kumbh five zodiac signs to be rich shani uday svs