19 November, Daily Astrology in Marathi : आज १९ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी मंगळवारी संध्याकाळी ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत राहील. मंगळवारी दुपारी २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत साध्य योग राहील. तसेच आज आर्द्रा नक्षत्रा दुपारी २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी सूर्य अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल. तर सूर्य अनुराधा नक्षत्रात प्रवेश करताच कोणाच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील हे आपण जाणून घेऊया…

१९ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल.

Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Tulsi Vivah 204 Date Time Puja Vidhi Shubh Muhurat in Marathi
Tulsi Vivah 2024 Date Time: १२ की १३, तुळशी विवाह नक्की कधी? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त
Aries To Pisces 8th November Horoscope
८ नोव्हेंबर पंचांग : उत्तराषाढा नक्षत्रात रवि योगाचा शुभ संयोग! मेष, वृषभसह ‘या’ ५ राशींना मिळेल प्रत्येक कार्यात भरघोस यश; वाचा तुमचे राशिभविष्य
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : शुक्र करणार धनु राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा, मिळेल प्रत्येक कामात यश
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य

वृषभ:- नवीन काम अंगावर येऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्‍यापैकी व्यस्त राहील. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आपली क्षमता लक्षात घ्यावी.

मिथुन:- कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. मन स्थिर ठेऊन विचार करावा. चंचलतेवर मात करावी लागेल.

कर्क:- आपल्या धाडसाचे फळ मिळेल. कचेरीची कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल.

सिंह:- अपेक्षित उत्तर हाती येईल. लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल.

कन्या:- मानसिक स्वास्थ्य जपावे. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. सहकारी वर्ग मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

तूळ:- महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील. हातातील काम यशस्वी होईल. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा.

वृश्चिक:- एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते. गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. एखादा वाद संपुष्टात येईल.

धनू:- घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल.

मकर:- अति धाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुगार खेळतांना सावध राहावे. हातातील गोष्टी जपून ठेवा. जुनी कामे आधी मार्गी लावावीत.

कुंभ:- आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत.

मीन:- काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळचे मित्र भेटतील. हातातील कामातून आनंद मिळेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )