19th July 2024 Marathi Rashi Bhavishya: १९ जुलै २०२४ ला आषाढ शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्रयोदशी तिथी कायम असेल. १९ जुलैच्या रात्री २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत इंद्र योग असणार आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत म्हणजे २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत मूल नक्षत्र जागृत असणार आहे. १९ जुलैला प्रदोष व्रत असणार आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजून ४६ मिनिटांपर्यंत बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे तसेच रवी आज पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीला कशाप्रकारे फायदा होणार आहे तसेच कोणत्या बाबतीत सतर्क राहायला हवे हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-कलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चर्चा कराल. जुन्या आठवणींनी मनाला समाधान मिळेल. खर्चासाठी हात आवरता घ्यावा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.

वृषभ:-बोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. हातातील कामात खंड पडू देऊ नका. घरातील कामांची जबाबदारी वाढेल. मनात उगाच शंका आणू नका. आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका.

मिथुन:-आपल्या निर्णयावर ठाम राहावे. लोकांशी वैयक्तिक संपर्क टाळावा. आवडीच्या गोष्टी करण्यात अधिक रमून जाल. अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.

कर्क:-सर्वांशी आपुलकीने वागा. बाहेरील लोकांना भेटणे टाळा. जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. हौसेवर पैसे खर्च कराल.

सिंह:-मित्रांशी गप्पा रंगतील. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. मनातील खिन्नता काढून टाकावी. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या कामाची शाबासकी मिळेल.

कन्या:-घरातील वातावरण आनंद देऊन जाईल. वरिष्ठांशी शांतपणे वागा. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. विनाकारण कुणाच्या मदतीला धावू नका. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या.

तूळ:-उत्तम वाचनाचा आनंद घ्याल. तिखट पदार्थ टाळा. भावंडांसाठी पैसा खर्च होईल. एखादी नवीन योजना सुचेल. शांत राहून मानसिक स्वास्थ्य अनुभवा.

वृश्चिक:-मुलांवरील खर्च वाढेल. आपल्या बोलण्यातून कोणी दुखवणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार जपून वापरा. वादाचे प्रसंग टाळावेत. संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका.

धनू:-समोरच्याचे शांतपणे ऐकून घ्यावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आर्थिक बाबतीत उत्तम दिवस. आहारावर नियंत्रण हवे. उत्साहाच्या भरात अनाठायी खर्च वाढू शकतो.

मकर:-छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. इतरांच्या कामात दिवस घालवाल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. उदात्त दृष्टीकोन ठेवाल. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल.

कुंभ:-निरूत्साह झटकून कामाला लागा. घरातील कामे मार्गी लावा. जुन्या गोष्टींबाबत मनात संभ्रम बाळगू नका. धाडस दाखवताना सारासार विचार करावा. समस्यांचे निराकरण करता येईल.

हे ही वाचा<< श्रावण सुरु होताच ‘या’ तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार; दुःख- संकट वाटेतून होतील दूर, प्रचंड धनलाभाचा योग

मीन:-स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बाळगा. अचानक येणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. अति तिखट पदार्थ कमी खा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांना वेळ द्यावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19th july panchang marathi horoscope ravi enters pushya nakshtra 12 rashi bhavishya on friday who will blessed by indra dev svs
Show comments