19th March 2024 Marathi Horoscope Today: काल म्हणजेच १८ मार्चला शनीचा कुंभ राशीत उदय झाला आहे. पंचांगानुसार आजपासून शनीची शक्ती वाढणार आहे. फाल्गुन मासातील शुक्ल पक्ष नवमीची आजची तिथी शनी प्रभावाने काही राशींना शुभ व काहींना कष्टदायी जाणार आहे. आज दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून १ मिनिटापर्यंत राहू काळ कायम असणार आहे. या पावणे दोन तासांचा कालावधी काही प्रमाणात अशुभ ठरू शकतो अन्यथा आजचा दिवस शुभ कार्यांसाठी सुद्धा उत्तम म्हणता येईल. आज मंगळवारी नेमकं तुमच्या राशीच्या नशिबात काय आहे याचा सुद्धा नीट आढावा घेऊया. पाहा मेष ते मीन राशीचे भविष्य

१९ मार्चचे मेष ते मीन राशी भविष्य

मेष:- कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बोलतांना वाणीत गोडवा ठेवाल. गायक लोकांचे कौतुक केले जाईल. झोपेचे तक्रार जाणवेल. चटपटीत पदार्थ चाखाल.

Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Daily Horoscope for Aries To Pisces
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
21st Decembe 2024 Mesh To Meen Horoscope In Marathi
२१ डिसेंबर पंचांग: आजपासून उत्तरायणारंभ! कोणत्या राशीच्या पदरी पडेल यश तर कोणाला ठेवावा लागेल संयम; वाचा तुमचे राशिभविष्य
Yearly Horoscope 2025 in Marathi
Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य
shani shukra yuti 2024
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा
19 December 2024 Rashi Bhavishya
१९ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचे दार; तुमच्या इच्छा आज पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य
shukra rashi parivartan 2024
२८ डिसेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा? शुक्राच्या राशी परिवर्तनाने मिळणार श्रीमंत होण्याची संधी

वृषभ:- सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वागणूक प्रेमळपणाची असेल. आल्या गेल्याचे उत्तम स्वागत कराल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. प्रलोभनाला बळी पडू नका.

मिथुन:- चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. जोडीदाराच्या सौख्यात रममाण व्हाल. स्पष्टपणे बोलणे टाळावे. फसवणुकीपासून सावध सहा. मानसिक चंचलता जाणवेल.

कर्क:- मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मुलांच्या कला गुणांचे कौतुक कराल. हौस मौज पूर्ण करून घ्याल. स्त्रियांच्या सहवासात वावराल.

सिंह:- कामे मनाजोगी पार पडतील. मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. जोडीदाराबरोबर मनमोकळी चर्चा कराल. काही कामे अकारण खोळंबतील. वात-विकाराचा त्रास जाणवेल.

कन्या:- परोपकाराचे महत्व समजून घ्याल. धार्मिक कामांत हातभार लावाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सर्वांना सहृदयतेने मदत कराल. नातेवाईकांशी विसंवाद टाळावा.

तूळ:- कामातून समाधान शोधाल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळच्या नातेवाईकांची नाराजी दूर करावी. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत.

वृश्चिक:- गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. मित्रा मंडळींचा गोतावळा जमा कराल. उत्तम गृह सौख्य लाभेल. पत्नीचे विचार आग्रही वाटू शकतात. प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल.

धनू:- नोकर-चाकरांचे सौख्य मिळेल. भावंडांची मदत घेता येईल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. आपल्या काही गोष्टींचे परिक्षण करावे.

मकर:- व्यावहारिक बुद्धिमत्ता वापरावी. काही गोष्टींचा सारासार विचार करावा. फार खोलात जाऊन अर्थ काढू नयेत. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.

कुंभ:- अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल. तुमचा अंदाज बरोबर ठरेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. सामुदायिक भानगडीत लक्ष घालू नका. नसत्या वादविवादात अडकू नका.

हे ही वाचा<< शनी उदय: आजपासून ५० टक्के राशींच्या नशिबाला येईल जाग; ‘या’ ६ राशी शनी जयंतीआधी होणार करोडपती?

मीन:- मित्रांशी मतभेद संभवतात. दिवसभर कामात व्यग्र राहाल. कानाच्या विकारांवर वेळीच उपाय करावेत. कष्टाला मागे पुढे पाहू नका. फसव्या लोकांपासून दूर राहावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader