19th September 2024 Horoscope and Panchang In Marathi : १९ ऑक्टोबरला अश्विन कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी शनिवारी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल. शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत सिद्धी योग राहील. तसेच भरणी नक्षत्र शनिवारी सकाळी १० वाजून ४७ पर्यंत जागृत असेल, त्यानंतर कृतिका नक्षत्र दिसेल. तसेच आज राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर आज कोणाच्या नशिबी पैसा, तर कोणाच्या नशिबी यश येणार हे आपण जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Rashibhavishya in Marathi) :

मेष:- जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. दिवस उत्तम रित्या व्यतीत कराल. व्यावसायिक क्षेत्रात ठाम रहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृषभ:- अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. अती विचार करू नका. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन:- कामाच्या शैलीत बदल करावा लागेल. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केन्द्रित करावे. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. स्वभावात करारीपणा बाळगावा. बोलताना तारतम्य बाळगावे.

कर्क:- राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फलदायी दिवस. घरासाठी आवर्जून काही गोष्टी कराल. खर्चाचा आकडा वाढता राहील. अधिकारी वर्गाला नाराज करू नका. दिवस धावपळीत जाईल.

सिंह:- विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. लोकांचा विश्वास संपादन कराल. संपूर्ण विचार केल्याशिवाय वचन देऊ नका. कलेतून चांगला लाभ होईल. नवीन प्रकल्प हाती घ्याल.

कन्या:- कौटुंबिक वातावरणात अधिक रमाल. समस्यांचे निराकरण होईल. लोकांकडून चांगल्या कामाची प्रशंसा होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. रचनात्मक कामे करता येतील.

तूळ:- आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. भविष्यातील योजनांवर काम चालू करा. मैत्रीचे नवीन प्रस्ताव येतील.

वृश्चिक:- दिवस धावपळीत जाईल. परंतु केलेल्या कामातून समाधान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.

धनू:- कार्यालयीन ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. झोपेची तक्रार जाणवेल.

मकर:- दिवसाची सुरवात उत्साहात कराल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. कामा व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. भावंडांशी मतभेद संभवतात. मानसिक शांतता जपावी.

कुंभ:- विरोधकांकडे दुर्लक्ष कराल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. अती तिखट पदार्थ खाऊ नयेत. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आपल्यातील आक्रमकतेला आवर घालावा.

मीन:- मनातील गैरसमज दूर करावेत. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न यश देतील. आपल्याच मतावर अडून राहू नका. मानसिक समतोल साधावा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19th october rashibhavishya and panchang of mesh to meen zodic signs success and love unlock door read marathi horoscope asp
Show comments