Guru Shani Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा ठराविक कालावधीनंतर काही प्रमाणात आपले चाल म्हणजेच प्रवासाचा मार्ग बदलत असतो. येत्या डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ तारखेला गुरुदेव मेष राशीत मार्गी होणार आहेत. तर दिवाळीपूर्वीच शनीदेव कुंभेत मार्गी झाले आहेत. २०२४ च्या सुरुवातीला बृहस्पती गुरुदेव आणि न्यायदेवता शनी एकत्रितपणे चार राशीच्या भाग्यात सुखाचा कालावधी सुरु करणार आहे. शनी व गुरूच्या कृपेने या राशींना प्रचंड धनलाभ व मानसिक शांती अनुभवता येईल असे दिसतेय. अशातच आता ३० ऑक्टोबरला राहू केतूचे परिवर्तन झाले असल्याने अनेक कामांना गती मिळणार असल्याची सुद्धा चिन्हे आहेत. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

गुरू, शनीच्या लाभ योगामुळे मेहनत घेतल्यास आणि चिकाटी ठेवल्यास महत्त्वाच्या कामात यश मिळेल. प्रगतीपथावर आगेकूच कराल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. ३१ डिसेंबरला गुरुचे मेष राशीत मार्गक्रमण सुरु होताच आपल्याला धन वैभवाची प्राप्ती होऊ शकते. आपल्या धन स्थानातील शनी लाभदायक ठरेल. भाग्यातील आणि दशम स्थानातील रवी आपल्या कर्तृत्वाची पोचपावती देईल. नवे संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आरंभशूरपणा कामी येणार नाही. सातत्य राखणे फार गरजेचे ठरेल. वरिष्ठ मंडळींशी संवाद साधताना शब्द सांभाळून वापरावेत.

Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Shukra Gochar 2024 Venus Transit 2024 in Capricorn astrology
Shukra Gochar 2024 : पुढील २६ दिवस या तीन राशींवर पडणार पैशांचा पाऊस! शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशाने करिअर, व्यवसायात भरघोस नफा
Rahu-Ketu rashi parivartan 2024
‘या’ चार राशी कमावणार पैसाच पैसा; राहू-केतूचे राशी परिवर्तन देणार मानसन्मान आणि गडगंज पैसा

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

षष्ठ आणि सप्तमातून असलेले गुरु शनीचे भ्रमण नोकरी व्यवसायासाठी उत्तम फळ देईल. भाग्यातील गुरू साहाय्य करेल. विद्यार्थी वर्गाला अडचणीतून मार्ग काढता येईल. धीर सोडू नका. शनीच्या कुंभ राशीतील वास्तव्यासह गुरुमुळे मोठी आव्हाने पेलून धराल. लाभ स्थानातील मंगळ आर्थिकदृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यास प्रवृत्त करेल. मेहनत आणि सातत्य राखल्यास यश तुमचेच आहे. कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी कला जोपासाल.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

लहानमोठे प्रवास करण्यास योग चांगले आहेत. कामानिमित्त वा कामाव्यतिरिक्त प्रवासाचा आनंद घ्याल. स्थावर मालमत्तेसंबंधीत कामे हळूहळू मार्गी लागतील. खरेदी वा विक्री करण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत. विद्यार्थी वर्गाला गुरुबल चांगले असल्याने प्रयत्नांना उत्तम यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हाल. जोडीदारासह जुळवून घ्याल. कौटुंबिक परिस्थिती हळुवारपणे हाताळाल. नोकरी व्यवसायात धनलाभ होईल. कष्टाचे चीज झाल्याने हुरूप वाढेल. वाडवडिलांचं रूपात धनलाभाची चिन्हे दिसून येत आहेत.

हे ही वाचा<<तुळशीच्या लग्नापर्यंत आदित्‍य मंगल योग बनल्याने लक्ष्‍मी माता ‘या’ राशींचे दार ठोठावणार; ‘या’ मार्गे होऊ शकता मालामाल

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

शनीची मेहनत, गुरुचे वैभव आणि रवीचे यश यांचा त्रिगुणी योग आहे. हाती घेतलेल्या कार्यात सफलता मिळेल. चिकाटी सोडू नका. नोकरीमध्ये गुरूच्या साथीने वरिष्ठ वर्गापुढे आपली मते ठामपणे मांडाल. व्यवसायात समस्यांवर उपाय शोधाल. व्यावसायिक नाती जोपासाल. व्यक्तींच्या गुणांची कदर कराल. विद्यार्थी वर्गाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. शनी आपल्या कष्टाचे चीज नक्की करेल. वैवाहिक सुख लाभू शकते. जोडीदाराच्या मदतीने मोठी धनप्राप्ती करू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader