1st January 2024 Horoscope Marathi: आज नववर्षाचा पहिला दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे हे आपण पाहणार आहोत. पहिल्याच दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार मेष ते मीन राशीच्या कुंडलीत काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

मेष:-कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.

Daily Horoscope for Aries To Pisces
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Yearly Horoscope 2025 in Marathi
Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य
shani gochar 2024 shash rajyog in marathi
शनीचा शश राजयोग ‘या’ ४ राशींना देणार प्रचंड धनलाभ? मार्च २०२५ पर्यंत अपार श्रीमंतीसह अनुभवू शकतात अच्छे दिन
shani shukra yuti 2024
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा
19 December 2024 Rashi Bhavishya
१९ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचे दार; तुमच्या इच्छा आज पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना नवीन वर्षात होईल आर्थिक लाभ, मिळणार दुप्पट पैसा
Shukra gochar 2025 venus transit in meen
Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार मालामाल; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख

वृषभ:-घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल.

मिथुन:-कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

कर्क:-उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा.

सिंह:-बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

कन्या:-खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.

तूळ:- एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल.

वृश्चिक:-झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनू:-घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल.

मकर:-अचानक उद्भवणार्‍या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा.

कुंभ:-जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे.

हे ही वाचा<< ४ फेब्रुवारीपर्यंत सोन्याचे दिवस जगतील ‘या’ शनी- सूर्य प्रिय राशीचे लोक; लक्ष्मीच्या ‘या’ रूपांमध्ये घरी येईल मांगल्य

मीन:-उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader