1st July Panchang & Rashi Bhavishya: आज १ जुलै २०२४ (सोमवार) रोजी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची दशमी तिथी आहे. आजच्या दिवशी अश्विनी / भरणी नक्षत्र जागृत असणार असून आजचा राहुकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटांपासून सुरु होईल ते सकाळी ९ वाजेपर्यंत असेल. पंचांगानुसार आजच्या दिवशी सुकर्मा योग असणार आहे. तर जुलै महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशींच्या व्यक्तींना कसा जाईल हे जाणून घेऊ या…

१ जुलै पंचांग व राशी भविष्य:

30th June Mararthi Panchang & Rashi Bhavishya
३० जून पंचांग: शनी महाराज झाले वक्री, आजचा सर्वार्थ सिद्धी योग मेष ते मीन राशींच्या नशिबाला कशी देईल कलाटणी?
Tripushkar Yoga with Yogini Ekadashi 2nd July Tuesday Panchang And Rashi Bhavishya Mesh To Meen Which zodiac signs will benefit Daily Marathi horoscope
२ जुलै पंचांग: योगिनी एकादशीचा ‘या’ राशींना होईल फायदा; १२ राशींपैकी कोणाचे दुःख, आर्थिक संकट होईल दूर? वाचा तुमचं राशिभविष्य
Budh Gochar 2024
आजपासून ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू, हाती येणार अमाप पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात गडगंज श्रीमंत
27th June 2024 Guruvar Rashi Bhavishya Krishna Paksha Shashti Tithi mesh to mean zodiac signs daily marathi horoscope in marathi
२७ जून पंचांग: नोकरी, व्यवसायात मिळेल लाभ, कामानिमित्त घडतील प्रवास; मेष ते मीन राशींचा असा जाईल गुरुवार
24th June Panchang & Rashi Bhavishya
२४ जून पंचाग: इंद्रदेव मेष ते मीन राशींपैकी ‘या’ मंडळींच्या कुंडलीत पाडणार सुखाचा पाऊस; धनवृद्धीने सुरु होईल आठवडा
masik rashifal july 2024 very lucky for 5 zodiac signs
जुलै महिना या ५ राशींसाठी ठरेल वरदान! मिळेल सुवर्णसंधी आणि राजवैभव
13th June Marathi Panchang Guru Gochar In Rohini Nakshtra Swami To Bless Mesh To Meen Rashi
१३ जून पंचांग: गुरुवारी स्वामी ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; मेष ते मीन राशींपैकी कुणाचं पारडं होणार धनसुखाने जड, वाचा
Rahu In Shani Nakshatra Gochar 2024
शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?

मेष:- स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाप्रमाणे घालवावा. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. गरजूंना मदत कराल.

वृषभ:- मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. व्यावसायिक अडचण मिटवाल. चांगल्या कामाची योजना आखाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.

मिथुन:- आर्थिक व्यवहार पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

कर्क:- परिवारातील प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कामाची दिवसभर धांदल राहील. कामाचा ताण नियोजनाने कमी करावा. आपलाच हेका खरा कराल.

सिंह:- कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. शक्यतो हलका आहार घ्यावा. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. प्रकाश झोतात याल.

कन्या:- मित्रमंडळींचे सहकार्य घ्यावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संयम ढळू देऊ नका. कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल. विशाल दृष्टीकोन बाळगावा.

तूळ:- नातेवाईकांची मागणी पुरवाल. जोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो. आकांततांडव करू नका. स्पर्धेत यश मिळवाल. उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल.

वृश्चिक:- आर्थिक प्रश्न सोडवाल. काही प्रश्न गोडीने सोडवावेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. बोलण्यावर ताबा ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्या.

धनू:- आज कामातून चांगला लाभ होईल. वादाच्या मुद्यातून मार्ग काढाल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. भौतिक सुखात वाढ होईल.

मकर:- व्यवसायातून चांगला लाभ होईल. लहानांशी मतभेदाची शक्यता. घराबाहेर वावरतांना सावध रहा. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कुंभ:- मनाचा तोल सांभाळावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल. उगाच बंधनात अडकू नका. वैचारिक धोरण बदलून पहावे. दिवस काहीसा धावपळीत जाईल.

मीन:- शक्यतो सौम्य प्रतिक्रिया द्या. वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्या. व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर