September 2023 Monthly Rashi Bhavishya Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ३० ते ३१ दिवसांच्या अंतराने ग्रह आपली चाल बदलून राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतात. काही संथ गतीने चालणारे ग्रह किंवा राहू- केतू सारखे पापग्रह परिवर्तन करत नसले तरी त्यांच्या मार्गी, वक्री, उदय, अस्त होण्याने राशीचक्रातील राशींवर कमी अधिक प्रभाव दिसून येत असतो. अशाच प्रकारे आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तब्बल ५ ग्रहांचे गोचर होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुरू मेष राशीत वक्री होईल. तर ४ सप्टेंबर रोजी शुक्र कर्क राशीत मार्गी होणार आहे. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत मार्गी होईल तर १७ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत गोचर करणार आहे. यानंतर सगळ्यात शेवटी मंगळ कन्या राशीत अस्त होणार आहे. यानुसार १ ते ३० सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत मेष ते मीन कोणत्या राशीवर कसा प्रभाव असणार हे जाणून घेऊया..

१ ते ३० सप्टेंबर १२ राशींचे भविष्य

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

वाहन खरेदीचे चांगले योग आहेत. वैयक्तिक आवडीनिवडी जपण्यासाठी खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरी व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडतील. त्रागा न करता त्यामागची कारणमीमांसा जाणून घ्यावी. सतत तणावाखाली राहणे आरोग्यदृष्ट्या चांगले नाही. रक्तदाबावर नियंत्रण ठेवावे. संततीप्राप्तीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. विवाह जमण्यास अनुकूल कालावधी आहे. परदेशासंबंधित करार होतील. गृहसौख्य मिळेल. प्रियजनांच्या भेटीगाठी झाल्याने उत्साह वाढेल. वरिष्ठांकडून साहाय्य मिळेल. नव्या संलग्न क्षेत्रातही काम करण्याचा विचार कराल.

mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Shani Transit 2025
येणारे ६५ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

तृतीय स्थानातील कर्क राशीतील शुक्र स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यास, छंद जोपासण्यास वेळ देईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांची त्यांच्या कामात , शिक्षणात प्रगती होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वाद घालू नका. काही महत्वाच्या संधी निसटून जातील. पण खचून जाऊ नका. धीराने घ्यावे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्याचे फळ मिळेल. न टाळता येणारे खर्च पुढे उभे राहतील. जखम झाल्यास त्यात पू होईल. जखम चिखळण्याची शक्यता आहे. योग्य काळजी घ्यावी.

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

आपली विवेक बुद्धी जागरूक ठेऊन नात्याची वीण घट्ट करा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त वा त्रस्त असेल. धीराने आणि सबुरीने घ्यावे. प्रश्न अलगद सोडवावे लागतील. स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री संबंधित बोलणी सुरू होतील. घाई करू नका. नोकरी व्यवसायात नवे करार करताना छुपे मुद्दे विशेष करून अभ्यासवेत. विद्यार्थी वर्गाला गुरू शनीची साथ लाख मोलाची ठरेल. आत्मविश्वासपूर्वक आगेकूच करावी. सातत्याने घेतलेले कष्ट फळास येतील. हाडे आणि स्नायूंसंबंधीत त्रास सहन करावा लागेल.

कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)

धन स्थानातील रवी बुध योग ‘उत्पन्न आणि खर्चाचे योग्य गणित मांडण्याची गरज आहे’ असे सूचित करत आहे. मोठेपणा मिरवण्यासाठी खर्च कराल तर अंगाशी येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांचे मन राखणे गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर अधिक जोर लावावा लागेल. कष्ट घ्याल तरच मेवा खाल. काही मुद्द्यांवरून जोडीदारासह वाद होतील. शब्द जपून वापरावेत. अन्यथा प्रकरण विकोपाला जाईल. कामाचे ठिकाण आणि घर यात समतोल साधणे गरजेचे !

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

ग्रहबल चांगले असल्याने आर्थिक उत्कर्ष होईल. धनलाभाचे योग चांगले आहेत. कौटुंबिक समस्यांवर उपाय सापडतील. स्थावर मालमत्तेचे काम पुढे सरकेल. सातत्याने केलेले प्रयत्न फळास येतील. नातेवाईकांच्या भेटी लाभदायक ठरतील. नवे संबंध जुळतील. विवाहोत्सुक मंडळींना ग्रहमान साथ देईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात हलगर्जीपणा न करता मन लावून अभ्यास करणे इष्ट आहे. अन्यथा प्रगतीचा आलेख खालावेल. चाकोरीबाह्य कल्पना सध्या दूर ठेवा.

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

एकंदरीत ग्रहबल चांगले असल्याने हाती घेतलेली कामे झपाट्याने पुढे सरकतील. सरकारी कामे मात्र लांबणीवर पडतील. त्यासाठी धीराने घेणेच बरे ! नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने आर्थिक पाठबळ चांगले मिळेल. नोकरीत बदल घ्यायचा असेल तर कालावधी योग्य आहे. खर्चाचे प्रमाण बरेच वाढेल. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गाच्या एकाग्रतेमुळे विषयाचे आकलन झटपट होईल. हवेतील प्रदूषणामुळे श्वासाचे विकार त्रास देतील.

कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)

आर्थिक गुंतवणूक करताना स्वतःसाठी मर्यादा रेषा निश्चित करावी लागेल. पळत्यापाठी जाताना हातात असलेलेही गमावण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात महिन्याच्या मध्यानंतर रवी आणि शुक्र यांचा आधार मिळेल. सैरभैर न होता धीराने घ्यावे. योजलेली सगळी कामे पूर्ण होणे कठीण आहे. तरी देखील सातत्य सोडू नका. मेहनत कमी पडू नये. जोडीदाराची साथ उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्गाच्या परदेशी शिक्षणासंबंधीत कामात विलंब होईल. अनपेक्षित हवा बदल मानवणार नाही. पित्त, वात आणि अपचन वाढेल.

धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)

लहानमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे कराल. इतरांची वाहवा मिळवाल. विद्यार्थी वर्गाने धोपट मार्ग सोडून आडमार्गाने जाऊ नये. मेहनती अंतीच आपल्याला यश मिळणार आहे. नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. आपल्या बोलण्याचा प्रभाव पडेल. सभा संमेलने गाजवाल. जोडीदाराच्या साथीने आपले भाग्य उजळेल. धनसंपत्ती , प्रसिद्धी मिळेल. विवाहोत्सुक मंडळींची जोडीदार निवड योग्य ठरेल. छाती, पोट आणि उत्सर्जनाचे विकार त्रासदायक ठरतील.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

उत्तम धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी नव्या वाटा उपलब्ध होतील. नोकरी व्यवसायात आर्थिक उन्नती होईल. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. इतरांशी तुलना करणे मात्र प्रकर्षाने टाळा. अन्यथा जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही. जोडीदाराच्या साथीमुळे भाग्य उजळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही, आनंदी राहील. विवाहोत्सुक मंडळींनी संशोधन सुरू ठेवावे. पण लगेच रेशीमगाठी जुळून येतील असे नाही. आरोग्य चांगले राहील.

मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)

मेहनत, बुद्धिमत्ता आणि चिकाटी यामुळे यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिक मंडळी नव्या संकल्पना अमलात आणतील. जोडीदाराची उत्तम साथ सोबत मिळाल्याने हुरूप वाढेल. स्थावर मालमत्तेची रखडलेली कामे मार्गी लावाल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित करावे. गुरुबल कमजोर आहे. मेहनतीला पर्याय नाही. प्रेमसंबंधात शब्द जपून वापरावेत. पाठीच्या मणक्याचा ताण वाढेल.

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

विशेष खबरदारी न घेतल्यास प्रवासात त्रास होईल. मानसिक तणाव वाढेल. नोकरी व्यवसायात कायम सतर्क राहावे. आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ निघू शकतो. तेव्हा शब्द सांभाळून वापरावेत. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. विद्यार्थी वर्गाने अधिक मेहनत घ्यावी. प्रयोग, वक्तृत्व आणि भाषेसंबंधीत अभ्यास यावर लक्ष केंद्रित करावे. जोडीदाराला त्याच्या कामात विशेष यश मिळेल. गुंतवणूक करताना जपून, सांभाळून करावी.

हे ही वाचा<< ३१ ऑगस्टपासून दत्तगुरुकृपेने ‘या’ ६ राशींचे लोक होतील श्रीमंत? श्रावणी गुरुवारी सुकर्म योग देईल आर्थिक बळ

मीन रास (Pisces Zodiac Horoscope)

साडेसाती असली तरी गुरुचे पाठबळ चांगले आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. स्थावर मालमत्तेसंबंधित कामे फारशी हलणार नाहीत. संतातीसाठी प्रयत्नशील राहावे. तत्काळ फळ मिळेल अशी अपेक्षा नको. नोकरीच्या निमित्ताने प्रवास कराल. व्यवसायातील खाचाखोचा समजून घेऊन मोठे निर्णय घ्यावेत. गुंतवणूक करताना या महिन्यात थोडी विश्रांती घेणे इष्ट ठरेल, संबंधित अभ्यास करावा. विद्यार्थी वर्गाच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader